EXCLUSIVE संजय कुटेंना मंत्रिपद नाकारल्याने कुटे समर्थकांचा सोशल मीडियावर नाराजीचा सूर! देवेंद्र फडणवीसांना करत आहेत टार्गेट; आता कुटे समर्थकांना "हे" कोण सांगणार?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार काल,१५ डिसेंबरला नागपुरात झाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जळगाव जामोद चे आमदार डॉ.संजय कुटे यांचे नाव बुलडाणा जिल्ह्यातून मंत्री पदासाठी आघाडीवर होते. शपथविधी सोहळ्यापूर्वी डॉ.संजय कुटे देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवती दिसत होते. अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागत रॅलीमध्ये डॉ.संजय कुटे फडणवीस यांच्या शेजारी रथावर स्वार झालेले दिसले..मात्र मंत्रिमंडळात डॉ. संजय कुटे यांची वर्णी लागली नाही..याउलट ज्यांचे नाव चर्चेत नव्हते अशा आ.आकाश फुंडकर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली..दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने डॉ. संजय कुटे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत..सोशल मीडियावरील विविध पोस्टमधून कुटे समर्थकांची नाराजी चव्हाट्यावर येत आहे..मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने कुटे समर्थक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत आहेत..

 

Mla
Related img.

बुलडाणा जिल्ह्यातून महायुतीचे ७ पैकी ६ आमदार निवडून आले. यात चैनसुख संचेती सर्वात ज्येष्ठ आहेत. मात्र मलकापूर अर्बन चे प्रकरण त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात अडचणीचे ठरले, शिवाय नव्या दमाच्या तरुणांना संधी देण्याचे भाजपचे धोरण असल्याने ७१ वर्षीय संचेती बाद झाले. त्यामुळे डॉ. संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी जोरदार चर्चा होती.२०१४ ते २०१९ च्या फडणवीस यांच्या टर्ममध्ये शेवटच्या काही महिन्यांसाठी संजय कुटे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. शिवाय कुटे यांची फडणवीस यांच्याशी असलेली जवळील देखील या चर्चेसाठी कारणीभूत होती. विदर्भातून निवडून आलेल्या भाजपच्या एकमेव महिला आमदार म्हणून श्वेताताई महाले यांना देखील संधी मिळू शकते अशी चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे शेवटपर्यंत कुणालाच कळले नाही. मंत्रीपदासाठी ज्यांच्या नावाची फारशी चर्चा नव्हती अशा आकाश फुंडकर यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची वार्ता काल दुपारी येऊन धडकली. विशेष म्हणजे त्यावर देखील कहर झाला आणि आकाश फुंडकर यांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्री पद मिळाले.. फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्याचे दुःख नाही मात्र कुटेंना वगळल्याने कुटे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या पोस्ट देखील कुटे समर्थकांकडून सुरू झाल्या आहेत..आता आमदार कुटे समर्थकांना हे कोण सांगणार की अशाने तुम्ही तुमच्याच नेत्याच्या अडचणी वाढवत आहात म्हणून......