"काम बोलता है..!" म्हणून मेहकर-लोणार मतदारसंघाचा कल महायुतीकडे! मतदारसंघातील १ लाख ६ हजार ६६० लाडक्या बहिणींच्या खात्यात ७९,५४,५०,००० जमा..

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार मतदारसंघाची निवडणूक यंदा एकतर्फी निकालाकडे जातांना दिसत आहे. जी काही लढत व्हायची ती वंचित बहुजन आघाडीच्या डॉ.ऋतुजा चव्हाण आणि विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्यातच होईल असे चित्र आहे. महाविकास आघाडीने प्रचारात उतरण्याआधीच विविध आघाड्यांवर कच खाल्ली आहे, त्यामुळे विद्यमान आ.संजय रायमुलकर हे यंदा किती मतांनी निवडून येतील अशी एकच चर्चा आता गावोगावी होतांना दिसत आहे. आ. रायमुलकर यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळात आणलेला हजारो कोटींचा निधी, त्या माध्यमातून गावागावांत झालेली विकासकामे, शिवाय महायुती सरकारने आणलेल्या लोकोपयोगी योजना या आ.संजय रायमुलकर यांच्या पथ्यावर पडतांना दिसत आहे. एकट्या लाडकी बहीण योजनेचा विचार केला तरी मेहकर लोणार मतदार संघात तब्बल १ लाख ६ हजार ६६० एवढ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंत तब्बल ७९ कोटी ५४ लाख ५० हजार रुपये एवढा निधी जमा झाला आहे...
 लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी योजना अतिशय लोकप्रिय ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील माय माऊल्यांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होतात. आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी ही मदत बहिणीसाठी अतिशय महत्वाची ठरत आहे.
नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक बहिणीच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अनेक कामांना हातभार लागला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान आ.संजय रायमुलकर यांना गावोगावी महिला भेटतात..लाडकी बहिण योजनेबद्दल धन्यवाद देतात, चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात. "लाडक्या बहिणींची ही माया ऊर्जा देणारी आहे, महायुती सरकार असेपर्यंत या योजनेला धक्का लागणार नाही.." असा शब्द आ. रायमुलकर लाडक्या बहिणींना देत आहेत..