बुलडाण्यात जयश्रीताईंचे वादळी भाषण! म्हणाल्या ,महिला आहे म्हणून अबला समजू नका.. महिषासुराचा वध रणचंडीकेनेच केला होता! हुकूमशाही विरुद्धच्या लढाईत साथ देण्याचे केले आवाहन...

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जयश्रीताई सुनील शेळके यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी सभेला संबोधित केले.या सभेत जयश्रीताई शेळके यांचे वादळी भाषण उपस्थितांमध्ये "विजयश्री"चा संचार करणारे ठरले.. रणरागिणी असावी तर अशीच.. अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमधून उमटल्या..आपल्या भाषणात जयश्रीताई शेळके यांनी सत्ताधारी आमदारांचा खरपूस भाषेत समाचार घेतला.. "इथे धमक्यांचे राजकारण सुरू आहे.. हुकूमशाहीचे राजकारण सुरू आहे..मात्र,मी महिला आहे म्हणून अबला समजू नका.. महिषासुराचा वध रणचंडीकेने केला होता हे ध्यानात घ्या.. धमक्यांना घाबरू नका, तुमची बहीण या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे. तुमच्यावर हल्ले होत असतील तर अर्ध्या रात्री मला बोलवा.. छातीचा कोट करून हे हल्ले परतवून लावण्यासाठी मी सक्षम आहे असे प्रतिपादन जयश्रीताई शेळके यांनी केले..यावेळी उपस्थित गर्दीतून टाळ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला...
   भाषणाच्या सुरुवातीला जयश्रीताई शेळके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी खूप मोठे काळीज दाखवून त्यांची उमेदवारी मला दिली.. माझ्या भावाने माझ्यासाठी केलेला हा त्याग मी कधीही विसरणार नाही..मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहील असे म्हणतांना जयश्रीताई भावूक झाल्या होत्या.
  बुलडाण्यात विकास झाला नाही केवळ विकासाचे गाजर दाखवले...
   गेल्या ५ पाच वर्षात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासाचे केवळ गाजर दाखवण्यात आले. विकासाचा गाज्या वाज्या करण्यात आला मात्र विकास दिसला नाही.. दिसल फक्त सौंदर्यकरण असे म्हणत या सौंदर्यकरणाच्या कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जयश्रीताई शेळके यांनी केला.
बुलढाणा शहरात महामानवांचे पुतळे बसवले मात्र हे पुतळे कसे बसवले हे सांगितल्या जात नाही. समाजाच्या लोकवर्गणीतून ही स्मारक उभारण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी शिवस्मारक समितीने लोक वर्गणी केली.या लोकवर्गणीतून या स्मारकाचे काम झाले मात्र याचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेतले असा आरोप यावेळी जयश्रीताई शेळके यांनी केला.महामानव आमची अस्मिता आहे, त्यामुळे या पुतळ्यांची विटंबना होऊ नये म्हणून आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. 
  खुर्ची हातातून जाईल म्हणून...
आम्ही जर जिद्दीला पेटलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल ..ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असे जयश्रीताई म्हणाल्या.इथे मोठ्या संख्येने महिला आल्या मात्र या महिलांना साड्या वाटून इथे आणावं लागलं नाही असा टोला जयश्रीताई यांनी विरोधकांना लगावला. २० तारखेला मतदान आहे, तोपर्यंत डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करावे लागेल.. खुर्ची हातातून निसटण्याची भीती असल्याने ते आता वेगवेगळे प्रकार करतील..कुणाला आमिष दाखवल्या जाईल, कुणाला धमक्या दाखवल्या जाईल मात्र या धमक्यांना अजिबात घाबरू नका.. २३ नोव्हेंबर नंतर इथे जयश्री शेळके नाही तर जालिंधर बुधवंत आमदार असतील, तुम्ही सर्व आमदार असाल... बुलडाण्याच्या परिवर्तनासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे..माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी राहील असे जयश्रीताई भाषणाच्या शेवटी म्हणाल्या...