उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जयश्रीताईंची पहिली प्रतिक्रिया.."बुलडाणा लाइव्ह"वर! पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे मानले आभार; म्हणाल्या, ही लढाई हुकूमशाही विरुद्ध...

नरेंद्र खेडेकर आणि जालिंधर बुधवतांचेही आभार मानले...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडी कडून बुलडाणा विधानसभेचा उमेदवार कोण? या चर्चांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयश्रीताई शेळके यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेचा एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. त्यामुळे बुलडाणा येथील लढत जयश्रीताई शेळके विरुद्ध संजय गायकवाड अशी होणार आहे. दरम्यान जयश्रीताई शेळके यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचे आभार मानले आहेत..

बुलडाणा येथील लढाई हुकूमशाही विरुद्ध आहे.. सर्वसामान्य जनतेच्या बळावर ही लढाई जिंकणार आहे. उद्धव साहेब ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे असे जयश्रीताई शेळके "बुलडाणा लाइव्ह"शी बोलतांना म्हणाल्या..

बुलडाणा विधानसभा मतदार संघाची लढाई ही सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. झुंडशाही, गुंडशाहीला जनता वैतागली आहे.त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन होणार हा ठाम विश्वास असल्याचेही जयश्रीताई म्हणाल्या. यावेळी बोलतांना त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचेही आभार मानले.