जयश्रीताईंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन! जयश्री ताई म्हणाल्या,कार्यकर्ता हाच उद्याचा आमदार! नरेंद्र खेडेकर म्हणाले, जयश्रीताई मुळे बुलडाण्यात वन साईट फाईट....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ८ नोव्हेंबर रोजी भव्य सभा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज,२ नोव्हेंबरला टिळक नाट्य क्रीडा मंदिर, विश्राम भवन जवळ करण्यात आले. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या...

उमेदवाराने प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कार्यकर्ता  स्वतःच उमेदवार आणि उद्याचा आमदार आहे. याची हमी देते. असे समजून कामाला लागा  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती एकजुटीचे दर्शन घडवणारी ठरली. महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या वज्रमुठी मुळे विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. विजय आपलाच असल्याचे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.यावेळीआमदार धीरज लिंगाडे,संपर्कप्रमुख नरूभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, नरेश शेळके, एडवोकेट गणेश पाटील, सुनील सपकाळ, संदीप दादा शेळके,शरद काळे, सईद सेठ, कदीरुद्दीन ,आशिष बाबा खरात, सत्तार कुरेशी, विनोद बेडवाल, बाजार समितीचे संचालक खरे, यशवंत धाबे, लखन गाडेकर, बीटी जाधव, पीएम जाधव ,पिंपरकर साहेब, एडवोकेट गणेश सिंग राजपूत, हेमंत खेडेकर, अनिल बावस्कर, मनोज चंदन, सुनील घाटे ,गजानन मामलकर ,शिवाजी गवई ,सुजित देशमुख,   महाविकास आघाडीचे तालुका, शहराध्यक्ष आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

जयश्रीताईंमुळे वन साईड फाईट - नरेंद्र खेडेकर

 जयश्रीताई शेळके यांचे नाव जाहीर होताच विरोधी पक्षाच्याची हवा टाईट झाली असून आता वनसाईड फाईट होणार असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी यावेळी केले. खेडेकर पुढे म्हणाले, खऱ्या अर्थाने ही लढाई प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी बुलडाणा विधानसभेच्या बूथवर परिश्रम घ्यावे. जास्तीत जास्त मते महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना मिळवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

ताईच्या पाठीशी अनेक भाऊ.. बुधवत

     उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले की, ताई तुमचे भाऊ खूप मेहनतीने काम करीत आहे. यावेळी आम्ही तुम्हाला आमदार म्हणून विधानसभेत पाठविणार आहे. तुमच्या हातून बुलढाण्याचा विकास होतांना आम्हाला पाहायचा आहे. 

भयमुक्त व्हा - आ. लींगाडे...

     धीरज लिंगाडे यांनी सांगितले की, बुलडाणा विधानसभा मतदारसंघात दहशतीचे वातावरण आहे. कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. मात्र या प्रकाराला न जुमानता जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी उभे राहून आपणास विजयाचा झेंडा फडकवायचा आहे असे सांगितले. संचलन काँग्रेसचे नेते सुनील सपकाळ यांनी केले.