Amazon Ad

बुलडाणा विधानसभेसाठी जयश्रीताई शेळके आज भरणार नामांकन अर्ज! सुषमा अंधारेंची तोफ बुलडाण्यात धडाडणार! खा.मुकुल वासनिकही राहणार उपस्थित!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री ताई शेळके आज ,२९ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. मुकुल वासनिक आणि शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
  बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी दिली आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्या आपला अर्ज दाखल करणार आहे. त्याआधी जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील टिळक क्रीडा व नाट्य मंडळाच्या मैदानात जाहीर सभा होणार आहे.
या सभेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकुल वासनिक, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे संबोधित करणार आहेत. दुपारी १२ वाजता ही सभा होणार असून या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे...