बुलडाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्रीताई शेळके हाच सक्षम पर्याय! धृपदराव सावळे यांचे प्रतिपादन; जयश्रीताईंना विजयी करण्याचे आवाहन..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जयश्रीताई शेळके या सामाजिक जाण असलेल्या नेतृत्व आहेत. शेतकरी आणि महिला प्रश्नांवर त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता जयश्रीताई शेळके यांच्यात आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या जयश्रीताई शेळके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते धृपदराव सावळे यांनी केले आहे.
 बुलडाणा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात काय झाले हे कुणाला सांगण्याची गरज नाही. ५ वर्षांत बोटावर मोजणाऱ्या लोकांचे भले झाले, सामान्य जनतेची स्थिती मात्र जैसे थे आहे असे धृपदराव सावळे म्हणाले. सर्वसामान्य नेतृत्व असलेल्या जयश्रीताईशेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा, बुलडाण्याचा चौफेर विकास त्या करतील असेही धृपदराव सावळे म्हणाले...