जयश्रीताईंनी गाजवले मैदान! म्हणाल्या, "सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं...."! बुलडाण्याची आमदार हीच ताई पाहिजे जनमनाचा सुर...
Nov 12, 2024, 18:55 IST
जयश्रीताईंनी गाजवले मैदान! म्हणाल्या, "सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं...."! बुलडाण्याची आमदार हीच ताई पाहिजे जनमनाचा सुर...
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणांसाठी ओळखल्या जातात..आज चिखली येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेतही जयश्रीताईंची तोफ धडाधड धडकली.. आपल्या भाषणांने त्यांनी जनमानसाच्या हृदयाचा ठाव घेतला.. जयश्रीताईंच्या भाषणावेळी होणाऱ्या टाळ्यांचा गजर,हेच दाखवून देत होता. "बुलडाण्याची आमदार हीच ताई व्हायला पाहिजे" असा सूर यावेळी सभेतून उमटतांना दिसला.
यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या कीजयश्रीताईंनी गाजवले चिखलीचे मैदान!मागील अडीच वर्षांत जे आपण भोगले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे.महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेला आहे.तरुण हवालदिल आहे. शेतकरी संकटात आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही. शेतीमालाचे भाव कमी केल्याने शेतकरी बांधवांची वाईट परिस्थिती आली आहे. याउलट खतांचे औषधांचे भाव वाढले आहे.अस्मानी सुलतानी संकटांनी शेतकरी हतबल आहे. हे सरकार आंधळ्या बहीऱ्यांचे सरकार आहे त्यांना काहीच दिसत नाही असे जयश्रीताई म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारे महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचे आवाहन जयश्रीताईंनी केले.
बेटी बचाव बेटी पढाव हा केवळ नारा दिला जात आहे. यांच्या कार्यकाळात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत.. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज आहे. ते रक्षण केवळ महाविकास आघाडीच करू शकते असेही जयश्रीताई म्हणाल्या. जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी आश्वासने देण्यात येतील. मात्र त्याला बळी पडू नका असेही जयश्रीताई म्हणाल्या."सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नहीं " या हिंदी शेर ने जयश्री ताईंनी आपल्या भाषणाचा समारोप केला..