Amazon Ad

बुलडाण्यातील दहशतीचे राजकारण संपवण्यासाठी जयश्रीताई ह्याच एकमेव पर्याय! शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे यांचे प्रतिपादन...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराची ओळख शांतता प्रिय शहर अशी होती. मात्र आता बुलडाणा शहरात गुंडाराज वाढले आहे.. दहशतीचे राजकारण वाढले आहे. ही दहशत मोडून काढण्यासाठी जयश्रीताई शेळके ह्याच एकमेव पर्याय असून २० नोव्हेंबरला जयश्रीताई शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे यांनी केले. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा उमेदवारी अर्ज आज बुलडाणा येथे दाखल करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

 पुढे बोलतांना छगन मेहेत्रे म्हणाले की, आता विधानसभा निवडणुकीत महायुतीची माती करण्यासाठी सज्ज व्हा.जिल्ह्याच्या ठिकाणी दहशत मोडून काढण्यासाठी, मलिदा गँग मोडून काढण्यासाठी जयश्रीताईंना विजयी करा असे ते म्हणाले. जयश्रीताईंनी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणे केले. विधानसभा निवडणुकीसाठी जालिंधर बुधवंत यांची उमेदवारी जवळपास फायनल झाली होती..

मात्र जिल्हाप्रमुख कसा असतो, शिवसैनिक कसा असतो हे जालिंदर बुधवंत यांनी दाखवून देत आपले भरलेले ताट जयश्री ताईंना दिले. बुलडाण्यात पुन्हा गुंडाराज आले तर माता भगिनींना उघडपणे रस्त्यावर फिरता येणार नाही. बुलडाणा शहराची ओळख शांतताप्रिय शहर म्हणून होती मात्र गेल्या पाच वर्षात इथे गुंडाराज आणि दहशत वाढली आहे असे ते म्हणाले. दहशतीचे राजकारण संपवून टाकण्यासाठी जयश्रीताई शेळके याच एकमेव पर्याय आहे असेही छगन मेहेत्रे म्हणाले.