जालिंधर बुधवतांचा भेटी- गाठींवर जोर! निवडणुकीचा प्लॅनही तयार; बुधवंत म्हणतात, मतदारसंघात निष्ठेची लहर! हुकूमशाहीला जनता जुमानत नाही...
Oct 17, 2024, 14:37 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढत रंगतदार होणार आहे. शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशीच लढत होणे जवळपास निश्चित आहे. उबाठा शिवसेनेची उमेदवारी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट आहे. त्या अनुषंगाने बुधवंत यांनी भेटी गाठींवर जोर दिलेला असून गावागावात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी लढत होणार असून मतदारसंघात आम्ही निष्ठेची लहर अनुभवत आहोत अशी प्रतिक्रिया जालिंधर बुधवंत यांनी दिली आहे..
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के २० टक्के राजकारण हे शिवसेनेची शिकवण आम्हाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसैनिक २४ तास कोणत्याही कामासाठी सज्ज असतो, त्यामुळे निवडणुका हा विषय आमच्यासाठी काही नवीन नाही. निवडणुकीची आमची संपूर्ण तयारी झाली आहे, मतदारसंघातील गावागावात आमचे नेटवर्क तयार आहे.संघटन बांधणी मजबूत आहे. त्यामुळे बूथवरील नियोजन झालेले आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी १००१ टक्के जिंकणार असा विश्वासही बुधवंत यांनी व्यक्त केला.
हुकूमशाहीला जनता जुमानत नाही...
गल्लीपासून दिल्लीपर्यंत हुकूमशाही आहे. मात्र लोकशाहीच्या उत्सवात जनता हुकूमशाहीला जुमानणार नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासह राज्यात देखील परिवर्तन होईल म्हणजे होईलच असेही जालिंधर बुधवंत म्हणाले..