Amazon Ad

जालिंधर बुधवतांनी कार्यअहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवला; मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचे ठाकरेकंडून कौतुक; म्हणाले,शाब्बास...तयारीला लागा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी काल आपला कार्यअहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काढलेल्या मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचे कौतुक यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. "शाब्बास ..निवडणुकीच्या तयारीला लागा" असे स्पष्ट आदेशही यावेळी ठाकरे यांनी बुधवतांना दिले.

शिवसेना पक्षफुटी नंतर जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली. सत्ताधारी आमदारांच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकवला. शिवाय जिल्ह्यात पक्ष संघटन देखील मजबूत केले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूकीची जोरदार तयारी जालिंधर बुधवंत यांच्याकडून सुरू आहे. शिवसैनिकांनी एकमुखाने उमेदवार म्हणून बुधवंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. बुधवत यांच्या नेतृत्वात गत महिन्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निघालेली मशाल यात्रा व त्यानंतर शहरात झालेला आक्रोश मोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत बुधवंत यांनी आघाडी घेतल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान या सगळ्या तयारीचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवा म्हणजेच ७ ऑक्टोबरला घेतला. काल, ८ ऑक्टोबरला पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी बुलडाणा जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यांना मातोश्री निवासस्थानी बोलवून घेत चर्चा केली.

बुलडाणा,मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बाबींचा आढवा यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. जिल्हाप्रमुख या नात्याने आपला कार्यअहवाल जालिंधर बुधवंत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. यावेळी ठाकरेंनी मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचे कौतुक केले.बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या तयारीला लागा अशा सूचनाही यावेळी ठाकरेंनी बुधवतांना केल्या..

बुधवंत म्हणतात तिकीट फिक्स...
 दरम्यान मातोश्री वर झालेल्या बैठकीची माहिती देताना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघाबाबत प्रामुख्याने चर्चा आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक लढणार असल्याचे म्हणत आपली उमेदवारी फिक्स आहे असेही ते म्हणाले.