जय सेवालाल! सिंदखेडराजा मतदारसंघासाठी पोहरागडावरून संदेश धडकला! महंत जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, डॉ.शशिकांत खेडेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा!
Nov 15, 2024, 18:41 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. "विकासपुरुष" म्हणून मिळालेली जनउपाधी डॉ. शशिकांत खेडेकर यांना घराघरात घेऊन गेली आहे. २५ वर्षे विरुद्ध डॉ. शशिकांत खेडेकर यांची ५ वर्षे अशी यंदाची लढत होत असून खेडेकर यांच्या प्रचारासाठी हजारो हात एकवटले आहेत.आता गोर बंजारा समाजाची काशी म्हणून विख्यात असलेल्या पोहरादेवी येथील महंत श्री. जितेंद्र महाराज यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील जनतेला डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. एक व्हिडिओ प्रसिद्ध करून महंत श्री जितेंद्रनाथ महाराज यांनी आपले आशीर्वाद डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळातच गोर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामे झाल्याचे महंत श्री. जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे. गोर बंजारा समाजाची संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी नगारा भवनाची निर्मिती महायुती सरकारच्या कार्यकाळातच झाल्याचेही महंत श्री. जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे. संत सेवालाल महाराज लभाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज वस्तीसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारच्या कार्यकाळातच देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आले पाहिजे, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपले मतदानरुपी आशीर्वाद डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी उभे करावे असेही श्री.जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे.