जागर राष्ट्रवादीचा; युवकांच्या भविष्याचा!७ फेब्रुवारीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य मेळावा! मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांचे आवाहन....
Feb 5, 2025, 08:43 IST
जिल्ह्यात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. १ पैकी १ अशा १०० टक्के स्ट्राइक रेटने जबरदस्त इनिंग झाल्यानंतर आता पक्षबांधणीवर जोर देण्यात येत आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भव्य सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. नाझेर काझी यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत.. संघटन बांधणी आणि युवक जागर या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात पक्षाच्या भविष्यातील दिशेचा वेध घेतला जाणार आहे.
पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना त्यांच्या शैलीत उत्तर देण्याचा संकल्पही या मेळाव्यात केला जाणार असल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी दिली आहे. अजितदादांनी नेहमीच युवकांवर विश्वास दाखवला आहे,पक्षात युवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहनही युवक जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर यांनी केले आहे...