याला म्हणतात काम! आमदार श्वेताताईंनी मतदारसंघाचा चेहरा- मोहरा बदलून टाकला! ह.भ.प प्रकाशबुवा जवंजाळ यांच्याकडून कौतुक! अमडापुर जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्ता मेळावा उत्साहात.....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या ५० वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे आमदार श्वेताताईंनी अलीकडच्या २ वर्षांत केली आहेत. आमदार श्वेताताई मुळेच गाव खेड्यांना विकास काय असतो हे माहीत झाले.त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे असे म्हणत जेष्ठ भाजप नेते तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांन पंढरपूरचे विश्वस्त ह.भ. प प्रकाशबुवा जवंजाळ यांनी आमदार श्वेताताईंच्या कामाचे कौतुक केले. अमडापुर येथील बल्लाळ देवी संस्थान येथे जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्याला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, सुनील वायाळ, भाजपचे चिखली शहर अध्यक्ष पंडितराव देशमुख, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस शेख बुढण, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, युवा मोर्चाचे संतोष काळे, ओबीसी सेलचे सुदर्शन खरात यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते..

Mahale

पुढे बोलतांना ह. भ. प प्रकाशबुवा जवंजाळ म्हणाले की, देशात आणि राज्यात एका विचारांचे सरकार असणे अतिशय आवश्यक आहे. देव, देश आणि धर्म यांच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. विरोधी पक्षाचे लोक फेक नेरेटिव्ह पसरवून समाजाला भ्रमित करण्याचे काम करत आहेत त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी या फेक नेरेटिव्हला ताकदीने उत्तर द्यावे असेही ते म्हणाले. विरोधक फेक नेरेटिव्ह पसरवतील आपण लोकांपर्यंत केलेली कामे पोहचवायची असेही ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले.गेल्या ५० वर्षांत झाला नाही एवढा विकास चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या २ वर्षांत झाल्याचे ते म्हणाले..

 जनतेच्या आशीर्वादामुळेच हे शक्य...
 २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भरभरून आशीर्वाद दिले, त्यामुळेच मतदारसंघात एवढी कामे करता आली. सबका साथ सबका विकास हेच भाजपचे धोरण आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून विकास कामे होत आहेत असे आमदार श्वेताताई यावेळी म्हणाल्या. कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विकासकामे झाल्यानंतर सामान्यांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे आणखी दुपटीने विकास कामे करण्याची प्रेरणा मिळते असेही आ. श्वेताताई यावेळी म्हणाल्या. यावेळी आ. श्वेताताईंनी सर्कल मध्ये सुरू असलेल्या विकासकामांची देखील माहिती आपल्या भाषणातून दिली.अमडापूर येथील बल्लाळ देवी संस्थानासाठी शक्य तितके योगदान देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या संस्थांनला ब वर्ग दर्जा मिळवून दिला.त्यातून ६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून दिला तसेच पर्यटन विकास अंतर्गत या संस्थांनला दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याचे आ. श्वेताताई म्हणाल्या. सर्कल मधील मौजे कव्हळा येथे कव्हळा ते डासाळा रस्त्यावर अत्यंत आवश्यक असलेल्या पूलाचे काम केले. या सर्कलमधील गावांमध्ये मुस्लिम समाजबांधवांसाठी शादीखाना तसेच इतर समाजबांधवांसाठी सभामंडप, रस्ते, डीपी उभे केल्याचे आ. श्वेताताई आपल्या भाषणातून म्हणाल्या.अमडापूर हे मतदारसंघातील सर्वात मोठे शहर असून भविष्यामध्ये होणारी नगरपंचायत आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अत्याधुनिक बस स्टँडचे काम प्रगतीपथावर आहे. मागासवर्गीय समाजबांधवांसाठी सामाजिक भवन, संविधान भवन, पायाभूत सुविधा तसेच विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून अनेक विकासकामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे आ. श्वेताताई म्हणाल्या..