माहौल बनतोय! डॉ. ऋतुजाताईंना मिळतोय दमदार प्रतिसाद; लाडक्या लेकीला, लाडक्या बहिणीला सभागृहात पाठवण्यासाठी अनेकांनी कसली कंबर! डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, प्रेम पाहून भारावले..."हा" विषय अजेंड्यावर....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांना तळागाळातून वाढता पाठिंबा मिळत आहे. गावोगावी होणारे दौरे, छोट्या प्रचारसभा, कॉर्नर बैठका यामधून उमटणाऱ्या मतदारांच्या प्रतिक्रिया संबंध मतदार संघात एक वेगळाच माहौल निर्माण करत आहेत..आता काही झाले तरी आपल्या लाडक्या लेकीला विधिमंडळाच्या सभागृहात पाठवायचेच असा निर्धार ठिकठिकाणी मायमाउल्या बोलून दाखवत आहेत.. ऋतुजाताईंना बहीण मानणाऱ्या शेकडो भावांच्या तोंडून देखील हेच उद्गार बाहेर पडत आहेत..दरम्यान माय माऊल्यांच्या आणि मतदारांच्या या प्रेमाने डॉ. ऋतुजाताई भारावून गेल्या आहेत.."मी कायम तुमच्या ऋणात राहील..तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण हे विकासाचे युद्ध छेडले आहे..या युद्धात आपला विजय निश्चित असून त्यानंतर मतदार संघाच्या सर्वांगीण उन्नतीची जबाबदारी माझी आहे..मी कर्तव्यात कसूर ठेवणार नाही" असे प्रांजळ प्रतिपादन डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी आज,७ नोव्हेंबरला आयोजित प्रचार दौऱ्यादरम्यान केले...
  आज ७ नोव्हेंबरला डॉ.ऋतुजा चव्हाण यांचा सुलतानपुर, बोरखेडी, वेणी, गुंधा, हिरडव, वढव, आरडव या गावांमध्ये प्रचार दौरा संपन्न झाला. प्रत्येक गावांत डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे जोरदार जल्लोषात स्वागत झाले..गावांतील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून प्रत्येक गावात कॉर्नर बैठकांना संबोधित करून डॉ. ऋतूजाताईंनी निवडणुकीत उभे राहण्याची भूमिका विशद केली. ही निवडणूक मी आमदार व्हावी यासाठी नाही तर मतदारसंघाच्या सर्वांगीण सर्वव्यापी विकासासाठी आहे. गेल्या ३० वर्षात मतदार संघात विकासाचा जो बॅकलॉग राहिला तो भरण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. लोणार सरोवराच्या ठिकाणी पर्यटन वाढले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे हा विषय आपल्या अजेंड्यावर आहे असे डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या..