काँग्रेसनेच संविधानाची पायमल्ली केली! सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगळे यांचा हल्लाबोल! म्हणाले, महायुतीचा संविधानावर विश्वास! विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरीही आ. रायमुलकरच विजयी होतील..
Nov 3, 2024, 07:31 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जेव्हा जेव्हा देशात संविधानाच्या पायमल्लीचा विषय निघतो तेव्हा तेव्हा काँग्रेसचेच नाव समोर येते. संविधानाचा गळा घोटण्याचे काम आतापर्यंत काँग्रेसनेच केले आहे, याची शेकडो उदाहरणे देता येतील. दलित समाजावर सर्वाधिक अत्याचार देखील काँग्रेस काळातच झाले. त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उबाठा वाले बसले असून मेहकरचे उबाठा उमेदवार महायुतीला संविधान विरोधी म्हणतात..त्यांनी जरा स्वतः आरशात पाहिले पाहिजे..महायुतीने आतापर्यंत केलेले प्रत्येक काम भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आणि संविधानाला केंद्रस्थानी ठेवूनच केले आहे. संविधान बदलाचा फेक नेरेटीव्ह लोकसभेत तुमच्या पचनी पडला मात्र आता पचनार नाही, कारण लोकांना तुमचे नखरे लक्षात आले आहेत, उगाच लोकांना भ्रमित करण्याचे काम करू नका..तुम्ही कितीही बोंबा मारल्या तरी डॉ.संजय रायमुलकरच विजयी होणार असे प्रतिपादन हिवरा आश्रम येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
पुढे नितीन इंगळे यांनी म्हटले की, आ.संजय रायमुलकर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतात. त्यामुळेच गेल्या तिन्ही निवडणुकांत त्यांचे मताधिक्य वाढत गेले आहे. "सबको अपना माननेवाला" अशी आमदार रायमुलकर यांची ओळख आहे. याउलट महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? कुठला हेदेखील लोकांना माहीत नाही. आ. रायमुलकर यांच्यावर जनतेचे अपार प्रेम आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलतांना विरोधकांनी जरा विचार करूनच बोलावे असेही नितीन इंगळे यांनी म्हटले आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या समाजबांधवांच्या लोकोपयोगी विकासकामांसाठी पून्हा एकदा आ. रायमुलकर यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले..