फुटले हो फुटले..!डॉ सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचाराचे नारळ फुटले! ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करू...
Nov 5, 2024, 13:52 IST
प्रचाराला सुरवात करताना दर्गा येथे भेट देऊन त्यांनी मौलाना यांचा आशिर्वाद घेतला व समोर श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन गजानन महाराज यांच्या पुढे नतमस्क होऊन परिवर्तनाच्या वाटेला बळकटी देण्यासाठी ही लढाई आहे अशी समर्पणात्मक भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ सौ. ऋतुजाताई चव्हाण यांना जनतेचा मिळणारा उदंड पाठिंबा व जनसंवाद दौरा पाहता मेहकर लोणार मतदारसंघात एकमेव दमदार नेता असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रचाराचे नारळ फोडून दणक्यात त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. ही प्रस्थापितांना धडकी बसवणारी गोष्ट आहे.
जनसमर्थन व जनतेचे मत पाहता ग्रामीण भागातून डॉ सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या मुळे प्रस्थापितांना मोठा धक्का बसत असल्याचे दिसुन येत आहे.