मी आले माझा मान ठेवा! ज्यांच्या हृदयात गोपीनाथ मुंडे साहेब त्या शशिकांत खेडेकर यांनाच विजयी करा! पंकजाताई मुंडे यांचे हात जोडून भावनिक आवाहन; म्हणाल्या, शशिकांत खेडेकर माझ्यासाठी लकी माणूस..!

 अफवांना बळी न पडण्याचे आवाहन; डॉ.सुनील कायंदेना सर्वांसमक्ष सांगितले, स्वतः उमेदवार समजून डॉ.खेडेकरांसाठी काम करा....
सिंदखेडराजात उसळला तुफान जनसागर....
 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी आज मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर विराट जाहीर सभा पार पडली. या सभेला भाजपच्या नेत्या स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे यांनी संबोधित केले..या सभेला तुफान गर्दी उसळली.. पंकजाताई मुंडे यांचे भाषण सुपरहिट ठरले.." मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी आले आहे, माझा मान ठेवा.. ज्यांच्या हृदयात गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आहेत त्या डॉ. शशिकांत खेडेकर यांना विजयी करा..डॉ.शशिकांत खेडेकर माझ्यासाठी लकी आहेत..ते जिंकले की मी मंत्री होते..त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता पूर्ण ताकदीने डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी काम करा" असे भावनिक आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित गर्दीतून टाळ्यांचा एकच गजर झाला....यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव, उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर, भाजपचे नेते डॉ.सुनील कायंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते..
  यावेळी पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, शशिकांत खेडेकर हे २०१४ ते २०१९ या काळात माझे सहकारी राहिलेले आहेत. मी मंत्री असताना या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी पाठपुरावा करून कामे करून घेतली आहेत. मी परळी एवढेच विकासासाठी प्राधान्य सिंदखेडराजाला देते. जेव्हा जागा सोडण्याचा विषय होता तेव्हा मी डॉ. सुनील कायंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय केला होता.पण जागा शिवसेनेला सुटली, पण...जाऊद्या.. डॉ. सुनील कायंदे यांची जबाबदारी माझी आहे.."आता स्वतःची निवडणूक समजून तुम्ही डॉ.शशिकांत खेडेकर यांच्यासाठी कामाला लागा" असे पंकजाताई मुंडे मंचावर बसलेल्या डॉ.सुनील कायंदे यांना उद्देशून म्हणाल्या..यावेळी टाळ्या आणि शिट्ट्यांचा तुफान गजर झाला. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी महायुती सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचा यावेळी आवर्जून उल्लेख पंकजाताई मुंडे यांनी केला.
  कोणत्याही माणसाला कधी कमी समजायचे नाही. धर्म आणि जातीच्या जीवावर राजकारण करायचे नाही. वंचितांची पिडीतांची सेवा करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहायचे ही मुंडे साहेबांची शिकवण असल्याचे यावेळी पंकजाताईंनी सांगितले. 
  शशिकांत खेडेकर प्रत्येक मेळाव्याला हजर..
१२ डिसेंबर ,३ जून आणि दसरा मेळावा असा एकही मी पाहिला नाही की जिथे मंचावर शशिकांत खेडेकर आले नाहीत.. प्रत्येक मेळाव्याला एवढ्या गर्दीत डॉ. शशिकांत खेडेकर यायचे, भगवान बाबांच्या समाधीवर नतमस्तक व्हायचे, माझ्या बाबांच्या समाधीवर नतमस्तक व्हायचे असे पंकजाताई म्हणाल्या. प्रत्येक दसरा मेळाव्याला शशिकांत खेडेकर हजर राहतात असेही पंकजाताई म्हणाल्या.त्यामुळे आता त्यांनी मला बोलावलं आणि मी आले असे पंकजाताई म्हणाल्या. सिंदखेड राजा मतदारसंघात सभा घेण्याची मला सवय आहे.. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे.. मी आलेली आहे, माझा मान ठेवा.. मागच्या वेळेला मी आली नव्हती आपल्याला काय मिळालं? असा सवाल त्यांनी उपस्थित गर्दीला केला.
हृदयातला फोटो बघा..
 या मतदारसंघात बरेच उमेदवार आहेत. प्रत्येक समाजाचे दोन तीन उमेदवार उभे आहेत. माझे फोटो कुणी लावले तर मी विरोध करणार नाही..मी अवमान करणार नाही.. माझे आणि मुंडे साहेबांचे फोटो कुणीही लावा.. पण हृदयातला फोटो बघा.. ज्यांच्या हृदयात मुंडे साहेबांचा फोटो आहे अशा शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले. शेतकरी कष्टकऱ्यांसाठी माता-भगिनींसाठी महायुतीचे सरकार आणण्यासाठी माझ्यावर जबाबदारी आहे. मी आता विधान परिषदेची म्हणजेच राज्याची आमदार आहे, मी तुमच्यासाठी देखील विकास कामे करणार आहे असेही पंकजाताई म्हणाल्या. यावेळी दोन-तीन मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचा दाखला देत पंकजाताई म्हणाल्या की, "शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षे माझ्यासोबत काम केले आहे. त्यांचे निवडून येणे माझ्यासाठी लकी आहे. कारण ते २०१४ ला निवडून आले तेव्हा मी मंत्री झाले होते, त्यामुळे तुम्ही मला मदत करा.." असे पंकजाताई म्हणाल्या. शशिकांत खेडेकर यांनी पाच वर्षे या मतदारसंघाच्या विकासासाठी झटून झटून काम केले. तुम्ही कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठल्याही दबावाला बळी पडू नका.. कुणी पाडायला उभे असते तर कुणी निवडून यायला उभे असते.. मी निवडून येणाऱ्याच्याच प्रचाराला येते असे पंकजाताई म्हणाल्या. तुम्ही योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा, सदैव तिकडे श्रद्धा बाळगणारे उमेदवार शशिकांत खेडेकर आहेत. वर्षातून तीनदा मुंडे साहेबांची जयंती, पुण्यतिथी आणि दसरा मेळाव्याला ते नेहमी मला भेटतात. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. माझ्याबरोबर अधिवेशनाला पाठवा..जोराने कामाला लागा.. धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबा असे आवाहन शेवटी पंकजाताई मुंडे यांनी केले.