निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत चप्पल - बुट घालणार नाही! चप्पल न घालता सोयाबीनही सोंगली!आमदार श्वेताताईंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची अशीही प्रतिज्ञा....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्वेताताई कार्यकर्त्यांना जीवापाड जपतात.. मतदारसंघात श्वेताताईंनी हजारो कोटी रुपयांची कामे केली..त्यामुळे आम्हाला पुन्हा आमदार म्हणून श्वेताताईच पाहिजे..२३ नोव्हेंबरला श्वेताताईंचा विजय निश्चित आहेत असे म्हणत  निकाल लागेपर्यंत पायात चप्पल किंवा बुट घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे ती करवंड येथील भाजपा कार्यकर्ते सचिन गरड पाटील यांनी...

दोन दिवसाआधी उदयनगर येथील जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात करवंड येथील सचिन गरड पाटील हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी पायात चप्पल घातलेली नव्हती, त्यावेळी कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता सचिन गरड यांनी त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञा बद्दल सांगितले. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत पायात चप्पल किंवा बुट घालणार नसल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे सचिन गरड यांनी सोयाबीन देखील पायात चप्पल न घालता सोंगली.कार्यकर्त्यांच्या अशा प्रेमामुळे मी भारावून गेले आहे,त्यामुळे २३ नोव्हेंबरचा निकाल निश्चित आहे अशी बोलकी प्रतिक्रिया यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी दिली..