गुंडगिरी आणि दहशतीच्या विरुद्ध स्वाभिमान जिवंत ठेवायचाय! जयश्री ताईंचे प्रतिपादन; म्हणाल्या, विकासाचे नवे पर्व आणण्यासाठी तुमच्या साथीची गरज! मोताळा तालुक्यात मशाल पेटली....

 

 मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघात गेल्या ५ वर्षांत केवळ दहशतीचे राजकारण होते. विकासाच्या नावाने बोंबा आहेत.कोट्यावधी रुपयांचे आकडे खोटे आहेत. मूलभूत सुविधांची वाणवा असताना ज्यातून जास्त कमिशन मिळते तीच कामे झाली आहेत. त्यामुळे आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व आणण्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे असे प्रतिपादन बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी केले.आज,१० नोव्हेंबरला मोताळा तालुक्यातील निपाना, माळेगांव, दहिगांव या गावांत जयश्रीताई शेळके यांचा प्रचार दौरा संपन्न झाला.यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या..

  उद्धव ठाकरे यांची बुलडाण्यात सभा झाल्यानंतर बुलडाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गावोगावी प्रचार दौरांना मिळणारा प्रतिसाद ही परिवर्तनाची नांदी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.आज, मोताळा तालुक्यातील निपाना, माळेगांव, दहिगांव या गावांत जयश्रीताईंचा प्रचार दौरा संपन्न झाला. या दौऱ्याला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू करायचे आहे, त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे..२० तारखेला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मतरुपी आशीर्वाद देण्याची विनंती यावेळी जयश्रीताई शेळके यांनी केली.