मेहकर विधासभेत परिवर्तन घडवायचेय! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे प्रतिपादन; मतदारसंघाचा चेहरा- मोहरा बदलवून दाखवणार म्हणाल्या....

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. मेहकर मतदार संघात असलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मायबाप जनतेने संधी दिल्यास मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवून टाकेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केले. डोणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

ऋतुजा चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीने अधिकृत उमेदवारी घोषित केलेली आहे. २८ ऑक्टोबरला प्रचंड शक्ती प्रदर्शन करून त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सध्या गावोगावी त्यांच्या भेटीगाठी सुरू असून..प्रत्येक दौऱ्यात प्रचंड जनसमुदाय त्यांना आपले समर्थन देत आहे. मेहकर येथील लढतीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले असून डॉ.संजय रायमुलकर यांच्याशी त्यांची लढत होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीतील गटबाजी मुळे ऋतुजा चव्हाण ह्या प्रमुख शर्यतीत आल्या आहेत...