आठवलेंची साथ सोडली! रिपाई चे माजी जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादीला बळकटी...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दमदार नेत्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. काल,७ मे रोजी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गवई यांच्या या प्रवेशामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बहुजन चळवळीतला दमदार नेता मिळाला आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे..

विधानसभा निवडणुकीच्या आधीच नरहरी गवई यांनी रिपाईच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नरहरी गवई यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. आता नरहरी गवई यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडोंच्या संख्येतील कार्यकर्त्यांनी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. " विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या. पक्षात प्रवेश करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वतीने बळ देण्यात येईल. सत्तेत देखील सहभाग देण्यात येईल" असा शब्द यावेळी अजित पवार यांनी दिला. 
 पीडित समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार:नरहरी गवई 
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी नरहरी गवई यांनी देखील मनोगत व्यक्त केले. अजितदादांच्या नेतृत्वावर संबंध महाराष्ट्राचा विश्वास आहे. पीडित , शोषित वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजित दादांची धडपड असते. दादांची कार्यपद्धती पाहूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे नरहरी गवई म्हणाले. नरहरी गवई गेल्या ४० वर्षांपासून रिपब्लिकन चळवळीत काम करत होते. जिल्हाभर त्यांचा दांडगा संपर्क आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी निवडणूक जिंकली आहे. २०१४ मध्ये मेहकर विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी युतीच्या तिकिटावर लढवली होती. कमी वेळेतील तयारीत देखील त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. गवई यांच्या प्रवेशामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. या प्रवेश सोहळ्यावेळी पालकमंत्री मकरंद आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे नाझेर काझी, प्रवक्ते महेश शिंदे, शंतनू बोंद्रे, टी. डी. अंभोरे पाटील यांची उपस्थिती होती....
यांनी केला प्रवेश...
यावेळी नरहरी गवई यांच्या नेतृत्वात बाळासाहेब दामोदर,दिलीपभाऊ वानखेडे ,आम्रपाल वाघमारे, शुभम दिलीपभाऊ वानखडे ,नितीन कांबळे ,भागवतभाई साळवे ,सुरेश खंडारे ,किरण दामोदर ,आकाश भैय्या हिरोळे, दिपक जाधव ,राहुल इंगळे,गजानन डोंगरदिवे ,
सागर जाधव ,सिद्धोधन गवई,विकी भैय्या कांबळे ,अशोकराव वानखेडे,सुदर्शन निकाळजे,नितीन शेजू,उद्धवराव वानखडे ,राजू शेठ इंगळे,रतनभाई वानखडे ,सौरभ भैया देशमुख,जकरंसिंग शिवणकर ,आकाश गोरे,गोविंदराव बोरस,प्रमोद हिवराळे ,अश्फाक खान,रहमतुल्ला खान ,अनिस खान शब्बीर खान,प्रमोद चौधरी ,भारत सपकाळ,संदीपकुमार वानखेडे,सतीश दांडगे ,पंजाबराव वानखडे ,सुमेध वानखडे,अमोल इंगळे ,बीबीसार क्षीरसागर ,अजय खरात,भीमसेन तायडे, सुकलाल साहू ,सुमित परदेशी,आकाश सोनवणे ,भूषण जामनिक ,सुरज हिरोळे ,सचिन बागडे ,विठ्ठल जाधव,जीवन पाटील ,सचिन पाखरे ,किशोर शिंदे ,अनामिक वानखडे ,उमेश जाधव , गजू चौरे ,गजानन डोंगरदिवे ,विशाल शेळके
 रफिक शहा लतीफ शहा यांच्यासह अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.