"शिवारात राबवताना विसरले भान..!जणू विठोबा चरणी मांडीयेले असे ध्यान";निवडणुकीच्या धामधुमीतही श्वेताताई पोहचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर; कोथिंबीरीच्या जुड्या बांधल्या!
माय माऊल्यांशी साधला आपुलकीचा संवाद! म्हणाल्या, भारत भाऊंची प्रेरणा....
Updated: Nov 9, 2024, 18:58 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सगळ्यांचा आटापिटा सुरू आहे. मात्र शेतकरी हा "जगाचा पोशिंदा" असल्याने इतरांना जगण्यासाठी रात्रंदिवस शेतीत कष्ट उपसतो. निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराच्या दरम्यान चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार श्वेताताई महाले यांनी मायमाऊल्यांसोबत आपुलकीचा संवाद साधला. लोकप्रतिनिधी असल्या तरी मातृहृदय हे मोठी देण महिला मंडळींना मिळालेली आहे. प्रचारादरम्यान शेतशिवारात काम करणाऱ्या महिला दिसल्या आणि काळ्या आईशी असलेलं आपलं नातं जपत श्वेताताई यांनी कोथिंबीरीच्या जुड्या बांधण्याचं काम केलं.
"शिवारात राबवताना विसरले भान ..जणू विठोबा चरणी मांडीयेले असे ध्यान"
निवडणूक आणि प्रचाराची धामधूम सुरू असताना शेतीत काम करणं म्हणजे विठ्ठल भक्ती आहे असं मी म्हणते. कारण मी देखील शेतकरी कुटुंबाचा भाग असल्याचा मला अभिमान असल्याचेही यावेळी श्वेताताई महाले यांनी यावेळी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जन आशीर्वाद दौऱ्यावर असताना शेकापूर येथील सुरेश पाटील यांच्या शेतात जाऊन कष्टकरी, शेतकरी माता-भगिनींशी श्वेता ताई महाले यांनी मनसोक्त संवाद साधला. आपण देखील शेतकरी कुटुंबातील असल्याने यानिमित्ताने बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्या आवर्जून म्हणाल्या.
भारत भाऊंच्या कार्याची प्रेरणा..
जलपुरुष म्हणून भारत भाऊ बोंद्रे यांनी केलेलं काम हे खूप मोठ आहे. सिंचनाशिवाय शेती बहरू शकत नाही. त्यामुळे भारतभाऊंच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आपलं काम राजकारणात सुरू आहे. वैनगंगा - नळगंगा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा आपण शासन दरबारी पाठपुरावा केला. हा प्रकल्प आता मंजूर झाला आहे हे पाणी पैनगंगेपर्यंत म्हणजे चिखलीत आणण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगताना त्या विसरल्या नाहीत.
कोणत्याही भागाचा समग्र विकास होण्यासाठी तेथे पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही गरज ओळखून माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी आमदार असताना चिखली मतदारसंघातील शेकापूर परिसरात धरणाची निर्मिती केली होती. सिंचनाची दूरदृष्टी असलेल्या भारतभाऊंच्या या पायाभूत विकासकार्याची फळे आज या परिसरातील शेतकरी चाखत आहेत. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान जाताना रस्त्यात लागलेल्या शेकापुरातील सुरेशभाऊ नरोटे यांच्या शेतात भेट दिली. तेथे कोथिंबीर काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणाऱ्या माता-भगिनींशी सुखद संवाद साधत श्वेताताई महाले यांनी कृषी कन्या असल्याचेच एकप्रकारे सिद्ध केले