


चांधई येथील शेकडो गावकऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश; कॉग्रेसला दिली सोडचिठ्ठी! आमदार श्वेताताईंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार...
Oct 26, 2024, 14:42 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीचा प्रचार नेमकाच सुरू झाला आहे. गावोगावी निवडणुकीचे वारे वाहत असताना चिखली शहराला लागूनच असलेल्या चांधई शेकडो बंधू-भगिनींनीसह गावकऱ्यांनी कॉग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला. आ. श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत दि. २६ ऑक्टोबर रोजी गावातील माजी उपसरपंच संदीप वानखडे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजातील महिला, पुरुष, युवक व गावकऱ्यांनी कॉग्रेस पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आ. श्वेताताई महाले यांनी चांधई येथील गावकरी व मातंग समाज बांधवांचे पक्षात सहर्ष स्वागत केले आणि आगामी काळात अधिक विकासनिधी देण्याचा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला.
चांधईचे सरपंच किशोर सोळंकी , सुरेश इंगळे स्वियसहाय्यक ,यांच्या पुढाकारातून गावचे उपसरपंच संदीप वानखडे,वामन इंगळे, प्रभाकर साबळे, गणेश सोनूने, अरुण सवडदकर, गणेश सवडदकर, गजानन इंगळे, तुळशीराम सोळंके, संदीप पवार, मधुकर चिंचोले, पवन रगड,धनंजय सोळंकी, शुभम भारती, गजानन इंगळे, राजेंद्र इंगळे, आकाश सोळंकी, गणेश अवसरमोल, ज्ञानेश्वर अवसरमोल, रामदास अवसरमोल, सहदेव साबळे, महादेव साबळे, सुनील साबळे, संदीप अवसरमोल, अजय अवसरमोल, विजय अवसरमोल, श्रीकृष्ण इंगळे, शिवाजी चिंचोले, किशोर अवसरमोल, अरुण साबळे, बबलू इंगळे,शेषराव जाधव, सोनू पवार, सरला अवसरमोल, चांगुना बदर, कमल अवसरमोल, कविता जाधव, भाग्यश्री अवसरमोल, वनिता साबळे, निलीमा साबळे, बबिता अवसरमोल, प्रभाकर साबळे, पांडुरंग गायकवाड व ज्ञानेश्वर गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
श्वेताताईंच्या पाठीशी उभे राहणार
पुढील महिन्यात २० ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या चांधई येथील सरपंच, उपसरपंच व गावातील संपूर्ण मातंग समाज तसेच गावकऱ्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.