गत तीन निवडणुकांत स्थानिकांना जमल नाही ते बाहेरच्या सिद्धार्थ खरातांना कसं जमणार? मेहकर मतदारसंघात एकच चर्चा, आता फक्त आ. रायमुलकरांचा लीड मोजा...
Nov 6, 2024, 16:10 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक याहीवर्षी आ.संजय रायमुलकरांना सोपी जाण्याची चिन्हे आहेत. गत तीन निवडणुकांत नाका - डोळ्याचे, बऱ्यापैकी मतदार संघात संपर्क असलेले स्थानिक नेते आ. रायमुलकरांच्या विरोधात मैदानात होते. मात्र तरीही तिन्ही निवडणुका आ.संजय रायमुलकर विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत तर चहुबाजूनी अनुकूल परिस्थिती असल्याने आ. रायमुलकरांचा यंदा फक्त लीड मोजा अश्या चर्चा मतदारसंघात गावोगावी होतांना दिसत आहेत...
यंदाची मेहकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रामुख्याने आ.संजय रायमुलकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्यात होईल असे चित्र आहे. महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार सिद्धार्थ खरात ऐनवेळी नोकरीचा राजीनामा देऊन मतदार संघात आले आहेत.. मतदार संघात संपर्क नाही की जनसामान्यांचे फारसे पाठबळही नाही अशी अवस्था खरात यांची झाली आहे. वैचारिक साम्य नसतांना देखील खरात यांनी आमदार होण्याच्या महत्त्वकांक्षापोटी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला खरा मात्र शिवसैनिकांना देखील खरात यांना उमेदवारी देणे रूचलेले नाही. यातच गत २००९ पासून झालेल्या तिन्ही निवडणुकांचा इतिहास पाहता आ. रायमुलकर यांना यावेळी ही निवडणूक सोपी जाईल अशी चिन्हे आहेत.
इतिहासाची पुनरावृत्ती?
२००९ च्या निवडणुकांत ॲड.साहेबराव सरदार सारखे स्थानिक नेतृत्व विरोधात असताना आमदार रायमुलकर यांनी ३३ हजार ७७ मतांनी विजय मिळवला होता.२०१४ मध्ये लक्ष्मण घुमरे यांच्यासारखे स्थानिक आणि जनतेत संपर्क असलेले लक्ष्मण घुमरे विरोधात होते.त्या निवडणुकीत ३५ हजार ९३५ मतांनी आ. रायमुलकर विजयी झाले होते. २०१९ मध्ये ॲड.अनंत वानखेडे यांच्याविरोधात १ लाख १२ हजार ३८ एवढी विक्रमी मते रायमुलकर तब्बल ६२ हजार ७०२ एवढ्या विक्रमी मताधिक्याने रायमुलकर यांनी गुलाल उधळला होता.यावेळी तर महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिलेला नाही. शिवाय महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी यामुळे ही लढत आ. रायमुलकर यांना सोपी झालेली दिसत आहे. यंदा रायमुलकर यांचा लीड किती? हा एकच प्रश्न आता मतदारसंघात चर्चिल्या जात आहे...