आली रे आली काँग्रेसची यादी आली! चिखलीतून पुन्हा एकदा राहुल बोंद्रेंना संधी.. काँग्रेस हाय कमांडचा निर्णय! चिखलीत फटाके फोडून जल्लोष...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा राहुल बोंद्रे यांना संधी दिली आहे. काल,२४ ऑक्टोबरच्या रात्री काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून राहुल सिद्धिविनायक बोंद्रे आणि मलकापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश एकडे यांना संधी दिली आहे...

 राहुल बोंद्रे सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाध्यक्ष या नात्याने संघटनात्मक बांधणीवर त्यांनी मजबूत पकड मिळवली आहे. २००९ आणि २०१४ अशा सलग दोन निवडणुकांत त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राहुल बोंद्रे यांची एकंदरीत राजकीय कारकीर्द पाहता पुन्हा एकदा राहुल बोंद्रे यांनाच संधी मिळेल हे जवळपास निश्चित होते. त्या अनुषंगाने त्यांनी विधानसभा मतदारसंघात प्रचारयंत्रणा राबविणे सुरू केले होते.अखेर आज काँग्रेसने त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. राहुल बोंद्रे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच चिखलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला...