आरोग्यदायी अर्थसंकल्प! केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया; म्हणाले,३६ औषधांवरील सीमाशुल्क माफ केल्याने औषधी होणार स्वस्त! सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "सब समाज को लिये साथ मे आगे है बढते जाना" हा केंद्र सरकारचा नारा आहे. त्याचे प्रतिबिंब आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिसले. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. कॅन्सर सह ३६ औषधांवरील सीमा शुल्क माफ केल्याने औषधी स्वस्त होणार आहे त्यामुळे हा अर्थसंकल्प आरोग्यदायी अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य व आयुष्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिली..
  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात कॅन्सरसह ३६ औषधांवरील सीमा शुल्क पूर्ण माफ केले आहे. त्यामुळे अनेक आजारांवरील औषधे आता स्वस्त होणार आहेत. याचा फायदा देशातील गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पामध्ये शेती, रोजगार ,लघु आणि मध्यम उद्योग, ऊर्जा, अर्थ या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. गोरगरीब जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडला आहे.
नव्या कर रचनेमुळे १२ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या ८० हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के कर माफी मिळणार आहे. १८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ७० हजारांचा तर २५ लाख उत्पन्न असलेल्यांचा कर १ लाख २५ हजारांनी कमी होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील धोरणांमुळे मोबाईल फोन स्वस्त होणार असल्याने सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होईल असेही ना.प्रतापराव जाधव म्हणाले.