पालकमंत्री मकरंद पाटील आज बुलडाणा जिल्ह्यात!आ. मनोज कायंदेंच्या घरी जाणार; नाझीर काझींना घरी जाऊन भेटणार! जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आढावा बैठक!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील आज,२५ जानेवारीला पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्र्यांचा आजचा दौरा मुक्कामी राहणार आहे, उद्या त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा होणार आहे. 
  आज दुपारी पावणे बारावाजेच्या सुमारास पालकमंत्री मकरंद जाधव पाटील मातृ तीर्थ सिंदखेड राजा येथे पोहोचतील. तिथे जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळी जाऊन ते अभिवादन करणार आहेत त्यानंतर ते जिजाऊ सृष्टीला देखील भेट देणार आहेत.
सव्वा बाराला पालकमंत्री मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या निवासस्थानी भेट देतील. १२:४५ वाजता ते देऊळगाव राजाकडे निघतील. १ वाजता आ. मनोज कायंदे यांच्या निवासस्थानी भेट देतील.१: ४५ वाजता पालकमंत्री मकरंद पाटील यांचा ताफा बुलडाण्याच्या दिशेने रवाना होईल. दुपारी ३ वाजता ते बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे पोहोचतील. साडेतीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक होईल. त्यानंतर ते मुक्कामासाठी पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे पोहोचतील, तिथे काही वेळ हा भेटीगाठींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 
उद्या २६ जानेवारीला सकाळी ९:१५ वाजता पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जिल्हा बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी १:३० वाजता ते संत नगरी शेगाव कडे प्रयाण करतील. दुपारी २:३० वाजता शेगाव येथे संत गजानन महाराजांची दर्शन घेऊन दुपारी ३ वाजता मुंबईकडे प्रयाण करणार आहेत...