बुलडाणेकरांसाठी गुड न्यूज! ३१ मार्चनंतर घराघरात दररोज पाणी;नव्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात; आ. संजय गायकवाडांची माहिती....

 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणेकरांना तीन महिन्यानंतर दररोज पाणी मिळणार असल्याची गोड बातमी आमदार संजय गायकवाड यांनी दिली. आज, २८ डिसेंबरला मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे...
  बुलडाणा नगर परिषदेच्या वतीने शंभर कोटी रुपयांच्या नवीन पाईपलाईन योजनेचे काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून ३१ मार्च नंतर बुलढाण्यातील घरोघरी नावांना पाणी सोडण्यात येणार असल्याचेही आमदार गायकवाड म्हणाले. १ जानेवारीपासून या कामाचे टेस्टिंग सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यावेळी उपस्थित होते...