धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा; बुलडाण्यात मंगळवारी भगवा जनसागर उसळणार; बांग्लादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश –न्याय मोर्चाचे आयोजन...
Dec 7, 2024, 19:17 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बांग्लादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. अल्पसंख्यांक हिंदू समाजाचे वास्तव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बुलडाण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश – न्याय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी १० डिसेंबरला हा मोर्चा होणार आहे..
"चला धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा! " या टॅगलाईन खाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील हिंदू समाज बांग्लादेशातील हिंदूंच्या सोबत आहे हा संदेश या मोर्चातून देण्यात येणार आहे. घाटावरील आणि घाटाखालील बुलडाणा जिल्ह्यातून या मोर्चात हजारो हिंदू बांधव सहभागी होणार आहेत. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून तिथेच जाहीर सभेत या मोर्चाचे रूपांतर होणार आहे. जातीभेद विसरून हिंदुत्वाच्या विषयावर एकत्रीत येत या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे..