डॉ.राजेंद्र शिंगणेंना गद्दार म्हणणाऱ्या गायत्री शिंगणे आता अजित पवारांच्या भेटीला! स्वतःला म्हणवून घ्यायच्या निष्ठावंत...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वतःला निष्ठावंत आणि आपल्या काकांना गद्दार म्हणणाऱ्या गायत्री शिंगणे आता मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची तयारी करीत असल्याचे वृत्त आहे.त्यांनी अजित पवार यांची भेट देखील घेतली आहे.

  डॉ.राजेंद्र शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते तेव्हा गायत्री शिंगणे त्यांच्या काकांवर गद्दार असल्याचे आरोप करत होत्या. आपणच कसे निष्ठावंत आहोत हेदेखील वेळोवेळी त्या माध्यमांना सांगत होत्या. डॉ. शिंगणे पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानंतर गायत्री शिंगणे यांच्याकडून अपक्ष लढण्याची तयारी सुरू झाली होती..आता मात्र स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या गायत्री शिंगणे अजित पवारांना भेटल्या आहेत..अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याची त्यांची इच्छा असली तरी महायुतीकडून आधीच प्रबळ दावेदार असल्याने गायत्री शिंगणे यांचा नंबर लागेल का? हे सांगणे सध्या तरी कठीण आहे...