माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांच्यावर माय - माऊल्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव! मशाल यात्रेत दिसतेय उद्धव ठाकरेंप्रती प्रचंड सहानुभूती;

दिलीप वाघ म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती महाविकास आघाडीचे सरकारच करेल....
 
.
सिंदखेडराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात १५ सप्टेंबर पासून सुरू झालेली मशाल यात्रा गावोगावी जात आहे. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मशाल यात्रेचे गावोगावी दमदार स्वागत होत आहे. गावोगावी माय- माउल्यांकडून दिलीप वाघ यांचे औक्षण करण्यात येत असून आशीर्वादाचा वर्षाव वाघ यांच्यावर होत आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कोरोना काळात कुटूंबप्रमुख म्हणून भूमिका निभावली त्यामुळे त्यांच्या प्रती जनसामान्यांमध्ये प्रचंड सहानुभूती असल्याचा अनुभव येत असल्याचे दिलीप वाघ म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे सरकार होते. मात्र गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला आणि गोरगरिबांशी गद्दारी केली. त्यामुळे आता जनता या गद्दारांना गाडण्यासाठी सज्ज झाली आहे असे रोखठोक प्रतिपादनही दिलीप वाघ यांनी मशाल यात्रेदरम्यान केले.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निघालेल्या मशाल यात्रेचा आज,२० सप्टेंबर रोजी चौथा दिवस होता. चांगेफळ येथून यात्रेला सुरुवात झाली, त्यानंतर बोरखेडी गंडे, धानोरा तांडा,बुट्टा तांडा, निमखेड,वर्दडी, गारखेड, वर्दडी तांडा, चिंचोली जहाँ, सुजलगाँव, वडाळी, आडगांव राजा,पिंपरखेड या गावांमध्ये मशाल यात्रा पोहचली. गावोगावी झालेल्या कॉर्नर बैठकांतून दिलीप वाघ यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीकेचा भडिमार केला. शिवाय स्थानिक आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यावर देखील दिलीप वाघ यांनी सडकून टीका केली.👇
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती महाविकास आघाडी सरकारच करेल...

Kayande

Advt.

 राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय विदारक आहे. शेतमालाला भाव नाही, उद्योगपती लाडका आणि शेतकरी मात्र परका असे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकरी मेला तरी या दळभद्री सरकारला फरक पडत नाही. शेतकऱ्यांचे सरकार कसे असले पाहिजे हे उद्धव साहेबांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकरी कर्जमुक्ती महाविकास आघाडीचे सरकारच करेल असे दिलीप वाघ म्हणाले.👇
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची ओळख मागास मतदारसंघ अशी आहे, तरुणांना रोजगार नाही, उद्योग व्यवसायाची संधी नाही. तरुणांना भिकेला लावण्याचे काम इथल्या आमदारांनी केले आहे असा घणाघात देखील दिलीप वाघ यांनी कॉर्नर बैठकीत केला.