बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा संदेश! म्हणाले, बुलडाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्रीताईंच्या पाठीशी रहा....
Nov 13, 2024, 10:14 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत जयश्रीताई शेळके यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आता माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करून जयश्रीताईंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न धडाडीने सभागृहात मांडण्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जयश्रीताई शेळके यांना सभागृहात पाठवा असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकनाथराव खडसे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे आपली शक्ती जयश्रीताईंच्या पाठीशी उभी करणार आहेत. एका व्हिडिओ संदेशात एकनाथराव खडसे यांनी जयश्रीताईंसाठी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. जयश्रीताई संबंध बुलडाणा मतदारसंघाला सुपरचित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे, मातृशक्तीला पाठबळ देण्यासाठी देखील जयश्री ताईंचे काम मोठे आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जयश्रीताई शेळके यांच्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.