Amazon Ad

BREAKING अर्ज पडताळणीत सिंदखेडराजातून पहिला अर्ज बाद! राष्ट्रवादीचा नेता स्पर्धेबाहेर? वाचा...

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल,२९ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.आज अर्जांची छाननी होत आहे..४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान अर्ज पडताळणी दरम्यान सिंदखेड राजातून एक अर्ज बाद करण्यात आला आहे.. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ३७ जणांनी ४९ अर्ज दाखल केले होते... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून प्रशांत दिलीप पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता..मात्र त्यांचा अर्ज पडताळणीत बाद करण्यात आला आहे..

 

 प्रशांत पाटील हे मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील राहणारे आहेत . त्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून अर्ज दाखल केला होता. मात्र राजकीय घडामोडीत मनोज कायंदे यांनी अर्जासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एबी फॉर्म जोडला. प्रशांत पाटील यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. दरम्यान प्रशांत पाटील हे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.