शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस; नगर पालिका अध्यक्षपदासाठी १३४, सदस्य पदासाठी १३१७ उमेदवारी अर्ज; ११ पालिकांच्या अध्यक्षपदासाठी २१२ तर सदस्यांसाठी एकूण २हजार ५४१ अर्ज !
Nov 18, 2025, 10:12 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात ११ नगर पालिका निवडणुक आता शिगेला पोहचली असून उमेदवारी दाखल करण्याचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजला.तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षाचा हात धरत उमेदवारी पदरात पाडून घेतली.राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारही वेट अँड वॉच करीत असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडला. शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदासाठी १३४ तर सदस्य पदासाठी तब्बल १ हजार ३१७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.आता ११ पालिकांच्या अध्यक्षपदासाठी २१२ तर सदस्यपदासाठी २ हजार ५४१ अर्ज आले आहेत.
सुरुवातीचे दोन दिवस अर्ज नाममात्र दाखल झाले होते.त्यानंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला अर्जांची सख्या वाढली आहे.पक्षाच्या तिकिटाची वाट पाहत शेवटचा दिवस उजाडला.सर्वच पक्षांनी आपले उमेदवार शेवटच्या दिवशी जाहीर केले.त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली.अनेक नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरत तिकीट मिळवले.११ नगराध्यक्ष पदासाठी १५ नोव्हेंबर रोजी २८ अर्ज दाखल झाले आहेत.तसेच सदस्य पदासाठी ५१५ अर्ज दाखल झाले आहेत.
असे दाखल झाले एकूण अर्ज
पालिका अध्यक्ष सदस्य
बुलढाणा १३ २४६
चिखली. २३ २६९
देऊळगाव राजा २३ १६८
खामगाव १३ २०२
लोणार २३ २२७
मलकापूर २० ३५९
मेहकर २० ३२५
नांदुरा १५. २०५
शेगाव ३६. २६७
सिंदखेड राजा १२ १०६
