EXCLUSIVE खासदार प्रतापराव जाधव आणि राजेंच्या ट्युनिंगची खमंग चर्चा!आमदार श्वेताताई महाले यांच्या कार्यक्रमात होते दोघेही सोबत उपस्थित; दोघांमध्ये काय झाली चर्चा?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेच्या बुलडाणा जिल्ह्यातील स्थापनेपासूनचे ते दोघेही शिवसैनिक. एकाच वेळी १९९५ ला दोघेही आमदार झाले. पण प्रतापगड शाबूत राखत आज केंद्रात सत्तेत असलेले नामदार प्रतापराव जाधव व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यात गतकाळात चांगलाच दुरावा सगळ्यांना पाहायला मिळाला. विजयराज शिंदे यांचे कट्टर विरोधक विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना मनसेतून शिवसेनेत घेत आणि त्यांनाच तिकीट देत आमदार पदापर्यंत नेण्याचे काम प्रतापराव जाधव यांनी केलं आणि तिथून या दोघांमधला संघर्ष आणखी वाढत गेला. मात्र अलीकडे राजकारणातली समीकरण बदलत चालली आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रसंगी गेम प्लॅन आणि प्लॅन गेम याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. ज्यांच्यातून उघडपणे विस्तव जात नव्हता त्यांच्या अगदी गाठीभेटी आणि मनोमिलन लोकसभेत पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यात आणखी ट्विस्ट वाढत आहेत. नामदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार विराजराज शिंदे यांच्यातील जमत असलेल्या ट्युनिंगची चर्चा आता रंगली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी घडवून आणलेल्या विकास कामांच्या भूमीपूजनाच्या मोठ्या कार्यक्रमात व्यासपीठावर नामदार जाधव आणि विजयराज शिंदे यांच्यातील हास्यविनोद आणि एकमेकांकडे पाहून सूचक पद्धतीने चाललेली चर्चा उपस्थितांमध्ये मात्र वेगळा सूर उमटवत होती. 

 

Bhumi
Advt. 👆

बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा सध्या महायुतीमध्ये शिंदे गटाकडे आहे. मात्र भाजप देखील या जागेवर आग्रही आहे. विजयराज शिंदे यांनी ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी देखील वरिष्ठांकडे केली आहे. हे सत्य लपून राहिलेले नाही. महत्वाचे म्हणजे भाजपचा एक गट देखील ही जागा भाजपला सुटावी यासाठी आग्रही आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यातच विजयराज शिंदे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील "विळ्या भोपळ्याचे सख्ख्य" सगळ्यांनाच माहिती आहे. 

Bhumi
Advt. 👆
महत्वाचे म्हणजे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांच्याआधी पहिल्या दिवशी जाऊन भरलेला उमेदवारी अर्ज, त्यानंतर माघार घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना करावा लागलेला फोन ; प्रतापरावांनी लगेच आमदार गायकवाड यांचे गाठलेले कार्यालय.. त्यानंतर विजयराज शिंदे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज आणि ज्यांच्यासोबत पटत नव्हते ते प्रतापराव जाधव स्वतः विजयराज शिंदे यांच्या घरी जाऊन झालेले मनोमिलन ...राजकीय दृष्ट्या या बाबींचे एकमेकांशी कनेक्शन जोडून जनमाणसांमध्ये चर्चांना वेग वाढला आहे.. चिखलीत पार पडलेल्या या दोघांच्या ट्युनिंग ची चर्चा सध्या जोरात आहे. महत्वाचे म्हणजे भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ह्या देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या...