EXCLUSIVE गायत्री शिंगणेंचा बालहट्ट! केवळ शिंगणे आडनाव या आधारावर गायत्री शिंगणे मैदानात? राजकीय उदयाआधीच अस्त होण्याची शक्यता....
जिल्हा बँकेच्या हितासाठी डॉ.राजेंद्र शिंगणे सत्ताधारी अजित पवार गटासोबत गेले. जिल्हा बँकेला ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोनही मिळाले. या वर्ष सव्वा वर्षाच्या काळातही डॉ.शिंगणे यांनी शरद पवार विरोधी भूमिका घेतली नाही, उलट मित्र पक्षातील नेते जेव्हा शरद पवारांवर बोलायचे तेव्हा डॉ.शिंगणे उघडपणे त्याचा निषेध करायचे. मात्र दुसरीकडे याच काळात गायत्री शिंगणे यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेला धुमारे फुटू लागले. डॉ.राजेंद्र शिंगणे या आपल्या काकांच्या विरोधातच गायत्री शिंगणे यांनी मोहीम उघडली. खरेतर कुटुंब म्हणून काही मर्यादा पाळायच्या असतात मात्र त्याही न पाळता त्या मिडीयाला बाईट देत राहिल्या.."काका- पुतणी" असा राजकीय चर्चेतला विषय असल्याने मीडियानेही बऱ्यापैकी कव्हरेज दिले आणि गायत्री शिंगणे यांना स्वतःला नेता झाल्यासारखे वाटू लागले. अर्थात एखादे महिला नेतृत्व समोर येत असेल तर ती गोष्ट चांगलीच..मात्र काकांच्या विरोधातच गायत्री शिंगणे यांनी घेतलेली भूमिका मतदारसंघातील जनतेला फारशी काही पटलेली दिसली नाही. शिंगणे कुटुंबातील सदस्य म्हणून अनेकांची गायत्री शिंगणे यांच्या प्रती सहानुभूती आहे, या सहानुभूती पोटीच गायत्री शिंगणे यांची सध्याची भूमिका चुकीचीच असे अनेक जण म्हणत आहेत..मात्र या सहानुभूतीचा चुकीचा अर्थ गायत्री शिंगणे यांच्याकडून लावला जातोय असे दिसतेय.."काका आपल्या विरोधात लढायला घाबरलेत" असा गैरसमज गायत्री शिंगणे यांनी करून घेतलेला दिसतोय..