Exclusive डॉ. शशिकांत खेडेकरांना लोकसभेची लागली आस! चिखलीत झळकले डॉ. शशिकांत खेडेकर विचारमंच,बुलडाणा लोकसभेचे बॅनर.... ना.जाधवांचे मंत्रीपद कुणाच्या डोळ्यात खुपतंय? आ.

तोंडांत साखर अन् डोक्यावर बर्फ ठेवून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम लावण्यात ना.जाधव तसे एक्सफर्ट..सलग तीनदा विधानसभा अन् चारदा लोकसभेचे रणांगण गाजवणारा हा मादणीचा पैलवान काही साधा सुधा नाही म्हणा..ते विरोधकांना आतापर्यंत पुरून उरलेत..मात्र जेव्हा हक्काची, आपली माणसं विरोधकांच्या भूमिकेत जातात तेव्हा साहजिकच माणूस आतून खचतोच, त्याचा धक्का बसतोच..आता तुम्हीच पहा ना..२०१९ ची बुलढाणा विधानसभेची निवडणूक प्रतापरावांनी किती प्रतिष्ठेची केली होती.. विजयराज शिंदेंचे तिकीट फायनल असतांनाच स्वतः प्रतापरावांनी संजय गायकवाड यांच्यासाठी तेव्हाचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकला, मी जिंकून आणतो हा शब्द दिला अन् गायकवाडांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. आ. संजय गायकवाड देखील पहिल्या अडीच वर्षात प्रतापराव जाधव आपले राजकीय गुरु असल्याचे सांगत होते. मात्र दुसऱ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेशी गायकवाडांची जवळीक वाढली अन् ना.प्रतापरावांची गरज संपल्याचे गायकवाडांना वाटू लागले. एवढे की प्रतापराव जिंकू शकत नसल्याचा सर्वे असल्याचे आ .गायकवाड सांगत होते. प्रतापरावांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच आ. गायकवाडांनी स्वतःच लोकसभेचा अर्ज भरला.. वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर माघार घेतली,मात्र स्वतः अर्ज का भरला याचे न पटणारे कारणही सांगितले..पुढे विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तर प्रतापरावांनी आपले काम केले नसल्याचे दुसऱ्यांदा जिंकलेल्या आ. गायकवाडांनी सांगून टाकले. आता जवळपास हा सगळा घटनाक्रम होऊन दीड –दोन वर्ष होत आलेत..मात्र ना.जाधव आणि आ.गायकवाड यांच्यात काही सलोखा राहिल्याचे दिसत नाही. आता आ. गायकवाडांच्या महत्वकांक्षा प्रचंड वाढू लागल्यात.. पक्षवाढीच्या नावाखाली प्रतापरावांना बाजूला करून ते चिखलीत शिरले, आता तर थेट लोणारमध्ये देखील (धर्मवीर युथ फाऊंडेशन) नावाने जनसंपर्क कार्यालय सुरू केले..