EXCLUSIVE डॉ. संजय रायमुलकरांच्या नम्रतेची एकनाथ शिंदे यांनाही मोहिनी ! जाहीर सभेतच प्रचिती, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक...
मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांच्या प्रचारासाठी एकनाथराव शिंदे यांनी सभा घेतली. सभेमध्ये डॉ. संजय रायमुलकर यांचे राजकीय गुरू असलेले केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव हे सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभे दिसले. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करायला उभे राहिले ;त्यावेळी अतिशय नम्रपणे डॉ.संजय रायमुलकर यांनी व त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा जनसमुदायासमोर नतमस्तक होत अभिवादन केले. हाच धागा पकडून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी देखील जनतेला आशीर्वाद मागणारा हा नम्र आमदार असून त्यांनी थेट दंडवत घातल्याचे आवर्जून सांगितले. गेल्या पंधरा वर्षात आमदार असतानाही डॉ. संजय रायमुलकर यांचा स्वभावातील नम्रपणा हा त्यांच्या लोकप्रियतेची वेगळी ओळख सांगून जातो. त्याची मोहिनी मुख्यमंत्र्यांना पडल्याचीही दिसून आले...