EXCLUSIVE मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल! रक्ताने लिहिलेले निवेदन फाटल्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंना संताप अनावर; म्हणाले, हुकूमशाहीचा अंत जवळ आलाय.....

 
Shelke

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल बोंद्रे यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी अडवणूक केल्याने राहुल बोंद्रे व शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊ शकले नाहीत, यावेळी बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात पोलिसांशी झालेल्या झटापटीत राहुल बोंद्रे यांच्या हातातील निवेदन फाटले. मुख्यमंत्री जयस्तंभ चौकातून निघून गेल्यानंतर राहुल बोंद्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईवर राहुल बोंद्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, हुकूमशाहीचा अंत जवळ आला आहे अशी घणाघाती प्रतिक्रिया राहुल बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Jadhav
Advt 
आम्हाला केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे होते. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, आम्ही त्यांना भेटायचे नाही तर कुणाला भेटायचे? आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागत होतो, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मागत होतो. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळ देखील मागितली होती मात्र आम्हाला वेळ देखील देण्यात आली नाही.
Gaykwad advt
  शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढे केले. रक्ताने लिहिलेले निवेदन फाडले.. मुख्यमंत्री शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, आगामी विधानसभा निवडणुकीत हुकूमशाहीचा अंत होणार म्हणजे होणारच असे राहुल बोंद्रे म्हणाले.