EXCLUCIVE आमदार सिद्धार्थ खरात यांची आपुलकी; मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतःचे हाताने बनवले जेवण; आ.खरातांना कसं जेवण आवडत? लसणाच्या चार पाकळ्या जास्त..त्यांनीच सांगितल...वाचा...
सहसचिव म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर सिद्धार्थ खरात यांनी मेहकर विधानसभेची निवडणूक लढवली. मूळचे सिंदखेडराजा मतदारसंघातील ताडशिवणी येथील खरातांवर बाहेरचे उमेदवार असल्याचे आरोप झाले. मात्र विरोधकांच्या आरोपांना पुरून उरत सिद्धार्थ खरात यांनी विजय साकारला. प्रचारादरम्यान सिद्धार्थ खरात यांच्या स्वभावाचे नवनवे पैलू कार्यकर्त्यांनी अनुभवले. मंत्रालयात उच्च पदांवर काम करूनही सिद्धार्थ खरात यांची जमिनीची जोडलेली नाळ लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करून गेली. दरम्यान आता आमदार झालेले सिद्धार्थ खरात आपल्या कार्यकर्त्यांची कशी काळजी घेतात याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
आमदारकीची शपथ घेण्यासाठी सिद्धार्थ खरात मुंबईला गेले आहेत, त्यांच्यासोबत मेहकर मतदार संघातील कार्यकर्तेही आहेत. सिद्धार्थ खरात यांचे मुंबईत घर असून त्यांच्या पत्नी देखील प्रशासकीय अधिकारी आहेत. दरम्यान काल विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर आ.सिद्धार्थ खरात कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईतील घरी गेले. खरात यांच्या पत्नी नोकरीनिमित्त बाहेर असल्याने आ.खरात यांनी स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवले. शिवसेनेचे मेहकर तालुकाप्रमुख निंबाजी पांडव यांच्या शेतातून सोबत नेलेली फुलगोबीची भाजी आ. खरात यांनी बनवली. यावेळी स्वयंपाक बनवत असताना एका कार्यकर्त्याने आ.खरात यांचा व्हिडिओ काढला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे..