आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी! आ.डॉ.संजय रायमुलकरांचा शब्द; लोणार तालुक्यातील गावभेट दौऱ्यात गावोगावी उस्फुर्त स्वागत! आज ३१ ऑक्टोबरला "या" गावांमध्ये आहे दौरा...
Oct 31, 2024, 08:25 IST
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा होतो.. मी तीन वेळा आमदार होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या वंदनीय हिंदुहृदसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन शिवसेनेचे काम करत होतो..२००९ मध्ये माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर वंदनीय बाळासाहेबांनी आणि माझे मार्गदर्शक ना. प्रतापराव जाधव साहेबांनी विश्वास दाखवला. मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी विधानसभेत पोहचलो..आयुष्यात ज्याचा विचारही केला नव्हता ते मिळाले..त्यामुळे पहिल्यांदा आमदार झालो तेव्हाच ठरवले होते की या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण तुमच्यासाठीच आहे..त्याप्रमाणेच मी आतापर्यंत काम करत आलो..माझ्या आयुष्यावर माझा नाही तर माय बाप जनतेचा अधिकार आहे असे प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांनी केले. लोणार तालुक्यातील आरडव, वढव, सोनुना, देऊळगाव वायसा, गोत्रा या गावांमध्ये आ. रायमुलकर यांचा गावभेट दौरा संपन्न झाला यावेळी बैठकांना संबोधित करतांना ते बोलत होते..

आ. डॉ.संजय रायमुलकर यांच्या गाव भेट दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी फटाक्यांच्या आतिशबाजीने गावकरी आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत करतात..त्यानंतर आ. रायमुलकर गावातील वडीलधारांच्या भेटीगाठी आणि आशीर्वाद घेतात..सगळे गावकरी मिळून एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा या बैठकीला देखील सभेचे स्वरूप प्राप्त होते..आ. रायमुलकर यांना चौथ्यांदा सभागृहात पाठवायचेच असा निर्धार गावागावांतील नागरिक बोलवून दाखवत होते..
आज ,३१ ऑक्टोबरचा दौरा..
आज ३१ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता बरटाळा, ९ वाजता जयताळा, १० वाजता शिवपुरी, ११ वाजता बदनापुर, १२ वाजता पारडा, १ वाजता चोंडी, २ वाजता कळपविहीर,३ वाजता चायगाव, ४ वाजता वर्दडी आणि सायंकाळी ५ वाजता वडगावमाळी असा आ. रायमुलकर यांचा प्रचार दौरा असणार आहे...