छत्र हरवलेतरी, तुम्ही छाया व्हा..नंदाताईंच्या भावनिक भाषणाने गर्दी भावविवश..!मनोज कायंदेंना विजयी करण्याचा निर्धार! देवानंदभाऊंना देणार खरी श्रद्धांजली....
Nov 15, 2024, 16:01 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज देवानंद कायंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा येथे छगनराव भुजबळ यांच्या जाहीर सभेत, नंदाताई कायंदे यांनी केलेल्या भावनिक भाषणाने गर्दी भावविवश झाली. देवानंद भाऊ यांचे मनोजवरचे छत्र हरवले असलेतरी, तुम्ही माय-बाप जनता त्याची छाया व्हा.. असे आवाहन त्यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
नंदाताई कायंदे पुढे म्हणाल्या की, मातृतीर्थ सिंदखेडराजा म्हटले की जिजाऊंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, खरेतर आम्ही एका कुटुंबातून दोन-दोन जण बोलत नाही...आम्ही त्याबाबतीत पथ्य पाळतो. माझ्या माय-बापाने, भगिनींनी जे अपार प्रेम दिले, असेच प्रेम आमच्या पाठीशी असू द्यावं.. असं मी आवाहन करते. आपण वेगवेगळ्या भागातून आलेल्या भगिनी-बांधव आहात, खरोखर हे तुमचे प्रेम आहे.
आता त्यांची उणीव येथे भासते. त्यांच्या छत्रछायेखाली मी वाढले, मोठी झाले, पण छत्र हरवल्यानंतर काय असतं हे छत्र नसलेल्याच कळतं. मी आता इथपर्यंत आले खूप मोठ मोठ्या पदावर काम केले. त्यामध्ये नलिनीताई पाटील, प्रतिभाताई पाटील यांच्यासोबत काम केले. हे काम करत असताना संबंध येणे हा मोठा योग होता. अजितदादा व भुजबळ साहेब यांनी जो विश्वास दाखवला खरोखरच त्यांचे कितीही आभार मानते. आपल्याला शिवाजी महाराजाची प्रेरणा, विचार घेऊन येथून पुढे जायचे आहे. आपण मनोज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन त्यांनी करत हा रथ माझे बांधव आणि भगिनी यांनी मनोजभाऊच्या रूपाने पुढे नेतील, असा विश्वास नंदाताईंनी व्यक्त करून कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. यावेळी देवानंदभाऊंना मनोज यांच्या विजयाच्या रूपाने खरी श्रद्धांजली देऊ अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या...