EXCLUSIVE राहुल गांधीच काय सोनियाजी आल्या तरी चिखलीची हवा पालटणार नाही! लोकांना विकास कामे करणारा लोकप्रतिनिधी हवा; आमदार श्वेताताईंचा राहुल गांधींवर हल्लाबोल...
Nov 12, 2024, 13:23 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसच्या उमेदवाराला चिखलीच्या जनतेने दहा वर्ष संधी दिली होती मात्र त्यांना कोणतीही कामे करता आली नाहीत. आम्ही पाच वर्षात हजारो कोटी रुपयांची कामे केली.. लोकांना विकास कामे करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो. त्यामुळे राहुल गांधीच काय सोनियाजी आल्या तरी चिखलीतील हवा पलटणार नाही असा हल्लाबोल आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.चिखलीत होत असलेल्या राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी श्वेताताईंना गाठले असता त्या बोलत होत्या.
चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षात हजारो कोटी रुपयांची कामी आम्ही केली आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला इथल्या लोकांनी दहा वर्षे संधी दिली, मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे राहुल गांधी आल्याने काही फरक पडणार नाही. राहुल गांधीच काय सोनियाजी आल्या तरी चिखलीची हवा बदलवू शकत नाहीत. चिखलीकरांनी महायुतीला विजयी करण्याचा निर्धार केला आहे असे श्वेताताई म्हणाल्या.