बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी हाेणार निवडणूक; जिल्हा परिषद निवडणूक विभाग पुनर्रचना :प्रारूप आदेश प्रसिद्ध!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषदेचे ६१ गट राहणार आहेत. तसेच पंचायत समितीचे गणांचे प्रारुप आराखडाही जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार निर्वाचक गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी निर्गमित केला. मसुद्याबाबत हरकती असल्यास तहसीलदार यांच्याकडे दि. २१ जुलैपूर्वी लेखी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बुलढाणा जिल्‍हा परिषदेचे ६१ गट राहणार आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेचे ६८ गट करण्यात आले हाेत. प्रारुप आदेशानंतर आता जिल्हा परिषदेची निवडणुक ६१ गटांसाठी हाेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये जळगाव जामाेद तालुक्यात जामाेद, खेर्डा बु, आसलगाव, पिंपळगाव काळे, संग्रामपूर तालुक्यात साेनाळा, बावणबीर, पळशी झाशी, पातुर्डा बु, शेगाव तालुक्यात जलंब, माटरगाव बु,नांदुरा तालुक्यात निमगाव, वसाडी बु,, चांदुरबिस्वा, वडनेर भाेलजी, मलकापूर तालुक्यात नरवेल, मलकापूर ग्रामीण, दाताळा, माेताळा तालुक्यात पिंप्रीगवळी, काेथळी, धामणगाव बढे, राेहीणखेड, बाेराखेडी, खामगाव तालुक्यात सुटाळा बु, घाटपुरी, अटाळी, अंत्रज, पिंपळगाव राजा, कुंबेफळ, लाखनवाडा बु, मेहकर तालुक्यात देऊळगाव साकर्शा, डाेणगाव, अंजनी बु, जानेफळ, कळंबेश्वर, देऊळगाव माळी, उकळी, चिखली तालुक्यात उदयनगर, अमडापूर, इसाेली, सवणा, केळवद, मेरा बु, मेरा खुर्द, बुलढाणा तालुक्यात देउळघाट, सुंदरखेड, साखळी बु, मासरुळ, धाड, रायपूर, देउळगाव राजा तालुक्यात देऊळगाव मही, सिनगाव जहाॅगीर, सावखेड भाेई, सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा, शेंदुर्जन, किनगाव राजा, दुसरबीड,वर्दडी बु, लाेणार तालुक्यात सुलतानपूर, वेणी, बिबी आणि पांगरा डाेळे आदी गट राहणार आहेत. या प्रारुप रचनेवर नागरिकांना हरकती सादर करता येणार आहेत. प्रारुप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे.