ELECTION SPECIAL चिखली विधानसभा मतदारसंघात "सोशल पॉवर" मध्ये श्वेताताईच नंबर वन...! "हायटेक" प्रचारातही घेतली आघाडी..
Nov 8, 2024, 10:44 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काही वर्षांआधी चुना - गेरू आणि भिंती रंगवून चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न व्हायचा..मात्र आता आधुनिक युगात प्रचार हायटेक झाला आहे..२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या हायटेक प्रचाराचे परिणाम केंद्रात भाजपच्या सत्तेच्या रूपाने दिसून आले होते..त्यानंतर मात्र सर्वच पक्षांनी हायटेक प्रचारावर भर दिला, सोशल मीडियावर ज्या वेगाने प्रचार करता येतो, आपली उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवता येते त्या तुलनेने दुसऱ्या कुठल्याही माध्यमांतून तो पोहचत नाही..त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारांनी सोशल मीडियाच्या प्रचारावर भर दिला आहे..सोशल मीडियावरील फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम या तीन माध्यमांतून सध्या प्रचाराचा जोर सुरू आहे.. चिखली विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सोशल मीडियावरील लोकप्रियतेत विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील टॉपला आहेत. सोशल मीडियावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर त्यांचे असंख्य फॉलोअर आहेत...
सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर अधिकृत खाते आहे. फेसबुकवर श्वेताताई यांचे १ लाख ६४ हजार फॉलोअर आहे. इंस्टाग्राम वर श्वेताताईंचे ९९ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. एक्स (पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग साईटवर ४० हजार ४०० फॉलोवर्स आहेत.आमदार श्वेताताई यांच्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहुल बोंद्रे सोशल मीडियावरील लोकप्रियतेत बरेच मागे आहेत. राहुल बोंद्रे यांचे फेसबुकवर १ लाख ८ हजार इंस्टाग्रामवर २४ हजार तर एक्स वर खाते असले तरी त्यावर त्यांच्ये केवळ २ हजार फॉलोअर्स असून ते खाते ॲक्टिव्ह दिसत नाही...