ELECTION SPECIAL नांद्रा धांडे व्हाया मेहकर टू मुंबई !शिवसैनिक म्हणतात, मेहकरात डॉ.संजय रायमुलकरच "विक्रमादित्य"! जाधवांचे गौरवोद्गार..
संजय रायमुलकर सामाजिक प्रश्नावर काम करणारा डॉक्टर, ना. प्रतापराव
Nov 6, 2024, 10:17 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):दिलेला आदेशाचा शब्द कुठल्याही परिणामाची परवा न करता तो पूर्ण करण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता, शाखाप्रमुख ,विभाग प्रमुख ,बाजार समितीचा संचालक ,उपसभापती आणि जनमाणसातील लोकप्रियतेचे आमदार म्हणून शिखर गाठतो ही बाब अतिशय मोलाची असून बुलडाणा जिल्ह्यात विजयी मतांच्या विक्रमवीर असणारे संजय रायमुलकर हे समाजातील विविध प्रश्नांवर काम करणारा डॉक्टर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते ना.प्रतापराव जाधव यांनी केले.
"नांद्रा धांडे व्हाया मेहकर टू मुंबई "असा आपला शिवसैनिक ते आमदार प्रवास करणारा हा कार्यकर्ता असून मेहकर व लोणार तालुक्यात संबंध गावांची तेथील लोकांची माहिती तोंडपाठ असणारा नेता आहे. विकासाच्या कामांसाठी पाठपुरावा करणारा आणि अभ्यासू पण ती सर्व कामे मार्गी लावण्यात कुठलीही कसूर मागे न ठेवणारे डॉ. संजय रायमुलकर हे पुन्हा विक्रमी विजय संपादन करतील असेही ना. प्रतापराव जाधव म्हणाले.
शिवसैनिक म्हणतात यंदाही डॉ. रायमुलकरच "विक्रमादित्य ...
मेहकर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा प्रतापगड. येथे गेल्या सहा टर्म पासून विजयी भगवा फडकलेला आहे. २००९ मध्ये आमचे नेते प्रतापराव जाधव यांनी डॉक्टर संजय रायमुलकर यांना उमेदवारी दिली. अतिशय सामान्य घरातून शेतकरी कुटुंबातून आलेले संजय रायमुलकर यांची पहिली निवडणूक ही लोकवर्गणीतून लढण्यात आली होती हे विशेष.!
२००९ मध्ये संजय रायमुलकर यांना ९१ हजार ४५७ मते मिळाली त्यावेळी प्रतिस्पर्धी असलेले ॲड. साहेबराव सरदार (राष्ट्रवादी काँग्रेस)-५८हजार ३८० मते मिळाली होती.
तब्बल ३३ हजार ०७७ मतांचा लीड डॉ.संजय रायमुलकर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. २०१४ सर्व पक्ष वेगळे लढले तेव्हाही शिवसेनेची मेहकर विधानसभा मतदारसंघातील ताकद निर्विवाद राहिली. संजय रायमुलकर यांना ८० हजार ३५६ मते तर दुसऱ्या क्रमांकावर लक्ष्मण घुमरे (काँग्रेस - ४४हजार४२१) होते. त्यावेळी ३५ हजार ९३५ मतांचा दणदणीत लीड होता. २०१९ मध्ये संजय रायमुलकर यांनी १ लाख १२ हजार ३८ मते घेत विजयी हॅट्रिक साधली. काँग्रेस चे ॲड.अनंत वानखेडे -४९ हजार ३३६ यांचा पराभव करत ६२ हजार ७०२ मतांचा विक्रमी लीड मिळवला होता. यंदाही २०२४ मध्ये लाखावर मते घेऊन डॉक्टर संजय रामुलकर हे विक्रमादित्यच ठरतील असा ठाम विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.