खा. प्रतापराव जाधवांकडून आमदार संजय गायकवाडांच्या विकास कामांचे कौतुक! म्हणाले,५ वर्षांत बुलडाण्याचा चेहरामोहरा बदलला; आमदार गायकवाड म्हणजे विकासाचा आयडॉल;

 पुढच्या ५ वर्षांत दहापटीने विकास करणार! भाईजी म्हणाले, विजयाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने जेवढी कामे केली तेवढी कामे कुठल्याही सरकारने एवढ्या कमी कालावधीत केलेली नाहीत. महाराष्ट्राला २४ तास ऍक्टिव्ह असणारा मुख्यमंत्री भेटलेला आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, शिक्षक, वकील,डॉक्टर, कर्मचारी सर्वांच्याच हिताचे सरकार आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात तर आमदार संजय गायकवाड यांनी हजारो कोटी रुपयांचा विकास केला आहे. पहिल्यांदा आमदार असून सुद्धा विकास कामांसाठी एवढ्या धडाडीने काम करणारा माणूस मी पाहिला नाही.. संजय गायकवाड म्हणजे खऱ्या अर्थाने विकास कामांसाठी आयडॉल आहेत असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी केले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ बुलढाणा शहरातील व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, इंजिनिअर, सेवानिवृत्त कर्मचारी, जेष्ठ नागरिक, डॉक्टर वकील अशा बुद्धीजीवी वर्गांची बैठक काल,१४ नोव्हेंबरला पार पडली या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा वाहिनी चांडक, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उद्योजक राजेश देशलहरा, डॉ. विष्णुपंत पाटील,डॉ.मधुकर पऱ्हाड,कमलेश कोठारी, डॉ. संजय बोथरा यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
  यावेळी पुढे बोलतांना ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केली आहेत. शेतकऱ्यांसाठी आता वर्षाला १५ हजार रुपये मिळत आहेत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाच्या योजना सुरू केली असून त्या योजनेच्या रकमेत देखील आता वाढ होणार आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणण्यात ते पटाईत आहेत. पहिल्यांदा आमदार असताना त्यांनी एवढी कामे केली आता दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर मतदार संघात दहापटीने विकास कामे होणार आहेत त्यामुळे आ.गायकवाड यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. संजय गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना विजयाचा ऍडव्हान्स शुभेच्छा देतो असे यावेळी भाईजी चांडक म्हणाले.