आमदार रायमुलकरांच्या गाव-भेट दौऱ्यांत ओथंबून वाहतोय जनसागर! कल्याणा, कंबरखेड, भालेगाववासियांनी केला आ. रायमुलकरांच्या विजयी चौकाराचा निर्धार!
राष्ट्रवादीचे नेते गिरधर पाटील म्हणाले, रायमुलकरांचा विजय ही काळ्या दगडावरची रेष!
आज,४ नोव्हेंबरला "असा" आहे दौरा...वाचा..
Nov 4, 2024, 07:18 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या गाव भेट दौऱ्यांना उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे. गावोगावी जनसागर ओथंबून वाहतोय की काय असे एकंदरीत चित्र त्यांच्या गावभेट दौऱ्यावेळी दिसते. गावोगावी फटाक्यांच्या आतिषबाजीत होणारे आ. रायमुलकर यांचे दमदार स्वागत, विजयी घोषणा, लाडक्या बहिणींकडून होणारे औक्षण अशा वातावरणात विजयाचा संचार आ. रायमुलकर यांच्या समर्थकांमध्ये झालेला दिसत आहे. यावेळी किती मताधिक्याने विजय? या एकाच विषयावर गावोगावी चर्चा झडत आहेत.
आमदार संजय रायमुलकर यांचा कंबरखेड, गवंढाळा, फरदापुर,कल्याणा,भालेगाव पाचला ,नायगाव दत्तापूर, शेंदला, साबरा आदी गावांमध्ये संपर्क दौरा पार पडला. प्रत्येक गावात नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. लाडक्या बहिणींनी अनेक ठिकाणी रायमुलकर यांचे औक्षण केले. नागरिकांची प्रचंड गर्दी बघता या वेळची निवडणूक रायमुलकर यांना अगदीच सोपी जाणार असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होती.
कल्याणा, भालेगाव, शेंदला येथे नागरिकांनी संजय रायमुलकर आणि इतर पदाधिकाऱ्यांचे भव्य स्वागत केले ,मोठी गर्दी यावेळी उसळली होती, विशेषता महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता, बँडच्या तालावर नृत्य करत युवकांनी आपल्या मनातील आनंद व्यक्त केला, सर्व गावांमध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला रायमुलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कल्याणा येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरधर पाटील यांनी सांगितले की ,केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांनी मतदार संघात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची विकास कामे केलेली असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता त्यांच्यावर प्रचंड खुआहे .शेतकऱ्यांसाठीही चांगले निर्णय महायुती सरकारने घेतल्याने त्याचाही लाभ त्येत्या निवडणुकीत महायुतीला होईल, असेही ते म्हणाले. संजय रायमुलकर हे निश्चितपणाने चौकार मारणार, ही काळया दगडावरची रेघ आहे, असेही गिरधर पाटील म्हणाले. मोठ्या प्रमाणात जनतेचे प्रेम लाभलेल्या या लोकनेत्याला हरविणे केवळ अशक्य आहे, असेही यावेळी ते म्हणाले.
यावेळी बोलतांना आ. रायमुलकर म्हणाले की,लोकांची सेवा करत राहणे हा माझा स्वभाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणच आहे ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण..मी कुठलाही जातीभेद मानत नाही .समोर येईल त्याचे काम करत राहतो. सेवारत राहणे मला आवडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव धाडसी मुख्यमंत्री असून त्यांच्या कार्यकाळात राज्य प्रगतीपथावर गेले. मेहकर मतदार संघातही प्रचंड संख्येने विकास कामे आणता आली असे यावेळी बोलताना आमदार रायमुलकर म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे महिला सशक्तिकरणाचे मोठे काम झाले असून ही योजना पुढे सुरूच राहणार आहे .योजनेच्या रकमेत भविष्यात वाढ करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलेले आहेत, असेही ते म्हणाले.संपर्क दौऱ्यामध्ये बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, संतोष चनखोरे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समाधान साबळे पाटील, प्रमोद काळे, भास्कर निकम, अरुण पोपळघट, ब्रम्हा धोंडगे ,अरुण दळवी ,ऋषी मानघाले, किशोर रहाटे, भुजंग रहाटे, प्रशांत काळे ,मधुकर मामा रहाटे, सरपंच श्री वाकोडे ,गजानन धोंडगे, रमेश धोंडगे, नितीन गारोळे, राजीव काटे ,शत्रुघ्न पाटील, कुंदन हुले,संदीप देशमुख, माऊली देशमुख, मदन चनखोरे, राजीव घनवट यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपर्क दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने संजय रायमुलकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असल्याचे दिसून येत आहे.
आज,४ नोव्हेंबरला असा आहे दौरा...
आज,४ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता बाभूळखेड, ९ वाजता कोयाळी, सकाळी साडेअकरा वाजता मेहकर, दुपारी ३ वाजता सुभानपुर, दुपारी ४ वाजता मोहदरी, सायंकाळी ५ वाजता सावंगी वीर, सायंकाळी ६ वाजता सावंगी माळी असा आमदार रायमुलकर यांचा दौरा असणार आहे...