डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला पराभूत करून धडा शिकवा! भाई विजय गवईंचे प्रतिपादन!
आ. श्वेताताई महाले यांचे सवना, वळती, पळसखेड जयंती, मालगणी, सावरगाव डुकरे, हातनी, सातगाव भुसारी, सोनेवाडी, अंत्री तेली, कोलारी आणि साखळी बु येथे उत्साहात स्वागत...
Updated: Nov 5, 2024, 19:43 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने सदोदित अपमानच केला. इतिहासात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, चिखली मतदारसंघात काँग्रेसच्या स्थानिक उमेदवाराने आपल्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या अवमानाचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर दाखवून दिले आहे. संविधान निर्मात्याचा अशाप्रकारे अवमान करणाऱ्या काँग्रेसला पराभूत करून काँग्रेसला योग्य तो धडा शिकवा असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी केले. दि. ५ नोव्हेंबर रोजी आयोजित आ. श्वेताताई महाले यांच्या भेटीगाठी दौऱ्या दरम्यान उपस्थितांसमोर भाषण करताना ते बोलत होते.
महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ गावभेटी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या दौऱ्या दरम्यान आ. महाले यांनी सवना, वळती, पळसखेड जयंती, मालगणी, सावरगाव डुकरे, हातनी, सातगाव भुसारी, सोनेवाडी, अंत्री तेली, कोलारी आणि साखळी बु या गावांना भेटी देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख तालुकाप्रमुख गजानन मोरे, भाजपा जिल्हा सचिव कृष्णकुमार सपकाळ, तालुका अध्यक्ष सुनील पोपळे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अमोल साठे, मंदार बाहेकर, पंजाबराव धनवे, सतीश काकडे, राजू चिंचोले, दत्ता खंडेलवाल, राजीव पाटील, अशोक पाटील, फकीरा लोखंडे, प्रकाश लोखंडे, संदीप लोखंडे, प्रदीप लोखंडे, अशोक काळे, परमेश्वर लोखंडे, सुरेश लोखंडे, दीपक लोखंडे, मोहन काळे, दीपक घुबे, निलेश लोखंडे, रवी लोखंडे, शाम भिसे, गुलाबराव लोखंडे, संतोष काळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणी गावात प्रवेश करताच स्थानिक महिलांकडून आ. श्वेताताई महाले यांचे औक्षण करण्यात आले. गावातून निघालेल्या प्रचार फेरीवर पुष्पवृष्टी करून गावकऱ्यांनी श्रीमती महाले यांचे स्वागत केले; तर प्रत्येक गावामध्ये पार पडलेल्या कोपरा सभेला ग्रामस्थ, शेतकरी, तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
काँग्रेसचे संविधान प्रेम खोटे - भाई विजय गवई
सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलण्याचे फेक नॅरेटिव्ह चालवून दलित समाजाची दिशाभूल करत मते घेतली. हेच काँग्रेसवाले चिखली मतदारसंघात मात्र संविधानविरोधी काम करण्याची एकही संधी सोडत नाहीत असा आरोप भाई विजय गवई यांनी केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दलितांची दिशाभूल करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पणतू म्हणून ज्या व्यक्तीला मतदारसंघात खेडोपाडी दलित वस्त्यांमध्ये फिरवले जात आहे त्या व्यक्तीच्या तोंडून काँग्रेस उमेदवारांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली जाते. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधने हा बाबासाहेबांचा अवमान असल्याची टीका विजय गवई यांनी केली.
श्वेताताईंच्या अडीच वर्षाची बरोबरी काँग्रेस उमेदवाराची दहा वर्षेही करू शकत नाहीत - प्रकाश महाराज जवंजाळ
आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच्या पाच वर्षांपैकी केवळ अडीच वर्षाचा कार्यकाळ श्वेताताई महाले यांना खऱ्या अर्थाने काम करण्यासाठी मिळाला. तरी देखील त्यांनी या अत्यल्प कालावधीत जेवढी विकासकामे केली त्यापैकी निम्मी कामे देखील इथे काँग्रेस आमदार असताना दहा वर्षात केली नाहीत असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. आ. श्वेताताई महाले यांचे हे कार्य पाहता या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय निश्चित असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याची आपल्याला मनोमन खात्री वाटते. आगामी महायुतीच्या सरकारमध्ये श्वेताताई मंत्री व्हाव्यात यासाठी या निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन जवंजाळ यांनी या दौऱ्यात बोलताना केले.
म्हणून श्वेताताईंना पुन्हा विजयी करा - गजानन मोरे
महायुती सरकारने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, दलित, अल्पसंख्यांक या प्रत्येक समाज घटकासाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या. या प्रत्येक योजनेची चिखली मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी आ. श्वेताताई महाले यांनी केली. प्रत्येक पात्र लाभार्थी पर्यंत योजनेचा लाभ पोहचण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. याशिवाय मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांचा अनुशेष देखील भरून काढला. त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला झाला असून या प्रगतीला अधिक वेग मिळावा म्हणून पुन्हा एकदा श्वेताताई महाले यांनाच विजयी करण्याची आवश्यकता आहे असे मत शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
जनसेवेच्या कार्यासाठी पुन्हा आशीर्वाद लाभूद्या - आ. श्वेताताई महाले
राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा व आपल्या परिसराचा विकास करण्याची संधी मला मागील पाच वर्षात तुम्ही दिली त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. हे ऋण फेडण्याचा प्रयत्न मी गेल्या अडीच वर्षात विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रयत्नाला अधिक बळ मिळावे आणि येणाऱ्या काळात देखील अधिकाधिक चांगली जनसेवा करता यावी यासाठी पुन्हा तुमचे मतदान रुपी आशीर्वाद लाभूद्या अशी विनंती या भेटीगाठी दौऱ्यादरम्यान आ. श्वेताताई महाले यांनी ग्रामीण भागातील मतदारांना केली.